पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत (Kasba Peth Bypoll) भाजपकडून हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्यक्ष प्रचार न करता भाजपसोबत उभी राहणार आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) आणि मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर (Sainath Babar) यांच्यात ट्विटर वॉर (Twitter War) सुरु आहे.
साईनाथ, सायबाचा उरलेला पेग चोरून पिलास का बाळा ?? शुद्धीवर ये.
तुझ्या सायबाने सुपारी घेतली आहे, तू फक्त मन लावून नाचायचं काम कर. https://t.co/K9RBwu7Q0T— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 15, 2023
मनसेच्या पाठिंब्यावरुन पुण्याचं राजकारण तापत आहे. कारण कसब्यात काँग्रेसचा उमेदवार आहे. पण राष्ट्रवादीचे समर्थक प्रचारात आघाडीवर राहिले आहेत. त्यामुळे मनसेच्या साईनाथ बाबर यांनी ट्विट करत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यावर खोचक टीका केली होती. त्याला प्रशांत जगताप यांनी आता चोख प्रत्युत्तर दिले आहे. साईनाथ बाबर यांनी प्रशांत जगताप यांना उद्देशून म्हटले होते की, ‘लग्न लोकाचं अन् नाचतायत दुसरेच’. त्यावर प्रशांत जगताप यांनी उत्तर देत म्हटलंय की, ‘बाळा शुद्धीवर ये…तुझ्या सायबानं सुपारी घेतली आहे, तू फक्त मन लावून नाचायचं काम कर’.
मनसेकडून भोकरे होते इच्छुक
पुण्यात कसबा पेठ मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी मनसेकडून गणेश भोकरे हे इच्छुक होते. मात्र, मनसेने पोटनिवडणुकीत न लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता राज ठाकरे यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला समर्थन देणार असल्याचे जाहीर केले.