Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Accident News : सोलापूर राष्ट्रीय महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा; धुळदेव गावच्या हद्दीत आणखी एक अपघात, दोन जण ठार

सातारा (कोडोली) येथील निकम कुटुंब हे देवदर्शनासाठी सातारा येथुन पंढरपूरला जात होते. त्यांचा धुळदेव गावच्या हद्दीत भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यूचा झाला.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 27, 2026 | 11:09 AM
Two Dead in Accident on Solapur National Highway within Dhuldev Village

Two Dead in Accident on Solapur National Highway within Dhuldev Village

Follow Us
Close
Follow Us:

Satara Accident News : म्हसवड : माण तालुक्यातील म्हसवड शहरालगच्या धुळदेव गावच्या हद्दीत आज सकाळी झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन जण जागीच ठार झाले तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील (Accident News) सर्व जखमींना सातारा येथील डॉ. क्रांतिसिह रुग्णालयात म्हसवड पोलीसांनी पाठवले आहे. (Satara News)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सातारा (कोडोली) येथील निकम कुटुंब हे देवदर्शनासाठी सातारा येथुन पंढरपूरला आपल्या आल्टो या चारचाकी वाहनाने निघाले होते. त्यांचे वाहन सकाळी ९ नंतर म्हसवड येथून पंढरपुरकडे निघाले होते. यावेळी धुळदेव गावच्या हद्दीत त्यांची आल्टो कार आल्यानंतर अपघात झाला. रस्ता उखडलेला असल्याने रस्त्याचा अंदाज आल्टो चालकास न आल्याने अचानक ब्रेक दाबल्याने आल्टो कार ने तीन ते चार पलट्या खाल्या. यामुळे झालेल्या अपघातामुळे आल्टोमधील दोन जण जागेवर ठार झाले तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हे देखील वाचा : समाज मनाचे प्रतिबंब मांडणाऱ्या कलाकारांचा गौरव; जागतिक रंगभूमी दिवस, 27 मार्चचा इतिहास

सदर अपघाताची माहिती धुळदेव गावात समजताच अनेक ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढत म्हसवड पोलीसांना याबाबत कळवले, सदर अपघाताची माहिती मिळताच पो. कॉ. अभिजीत भादुले, पो. ना. लुबाळ व पो. हवा. हांगे हे तात्काळ घटनास्थळावर पोहचले, त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने १०८ या रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना म्हसवड येथील संचित रुग्णालयात आणले त्याठिकाणी जखमींवर प्राथमोपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने सातारा येथील डॉ क्रांतिसिह रुग्णालयात पाठवले.

हे देखील वाचा : “व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी…”; काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर?

दरम्यान सदर अपघातामुळे धुळदेव ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले आहेत. तसेच या अपघातास प्रशासनच जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, सातारा ते सोलापुर हा राष्ट्रीय महामार्ग असुन धुळदेव गावच्या हद्दीतच या रस्त्याचे काम गत ८ वर्षापासुन रस्ते विकास महामंडळाकडुन रखडवण्यात आले आहे, सदरचे काम पूर्ण करावे यासाठी आजवर येथील ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलने करुन प्रशासनाला याचा जाब विचारला आहे, मात्र प्रशासनाने त्यांची फक्त बोळवणच केल्याने अपघातांची मालिका येथे आज ही सुरु असुन आजवर जवळपास २० जणांना याठिकाणी आपला जीव गमवावा लागला आहे, तर आजवर जवळपास ३०० हुन अधिक छोटे – मोठे अपघात याठिकाणी झाले असून आणखी कितीजणांचा जीव गेल्यावर प्रशासनाला या रस्तेकामी जाग येणार असा संतप्त सवाल धुळदेव ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Two dead in accident on solapur national highway within dhuldev village

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • Accident News
  • Mhaswad
  • Satara News

संबंधित बातम्या

खेड ग्रामपंचायतीत धडक कारवाई; आर्थिक अनियमिततेप्रकरणी सरपंच लता फरांदे यांची हकालपट्टी
1

खेड ग्रामपंचायतीत धडक कारवाई; आर्थिक अनियमिततेप्रकरणी सरपंच लता फरांदे यांची हकालपट्टी

Satara : सातारा पालिकेतील वादावर दोन्ही राजे ‘ॲक्शन मोड’मध्ये,नगरसेवकांची कानउघाडणी
2

Satara : सातारा पालिकेतील वादावर दोन्ही राजे ‘ॲक्शन मोड’मध्ये,नगरसेवकांची कानउघाडणी

काशिळ-पाली मार्गावर भीषण अपघात, रस्त्यावर पडलेल्या डांबराला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू
3

काशिळ-पाली मार्गावर भीषण अपघात, रस्त्यावर पडलेल्या डांबराला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

चारा-पाण्याविना हंबरडा; म्हसवडमध्ये जर्शी बछड्यांची दयनीय अवस्था, वनविभागाकडे मदतीची मागणी
4

चारा-पाण्याविना हंबरडा; म्हसवडमध्ये जर्शी बछड्यांची दयनीय अवस्था, वनविभागाकडे मदतीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.