संगमेश्वरमध्ये बसला अपघात (फोटो- टीम नवराष्ट्र)
संगमेश्वरमध्ये सहलीच्या बसला अपघात
ताबा सुटल्याने फूणगुस येथे दुर्घटना
विद्यार्थ्यांच्या रडण्याचा, ओरडण्याचा आवाज
संगमेश्वर: बीड जिल्ह्यातील धारूर येथील शालेय विद्याथ्यांची सहल घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला. गणपतीपुळे येथून महाडकडे बस निघाली होती. फुणगुस येथील भोसलेवाडी मंगळवारी सकाळी ही घटना घडली. बस रस्त्याच्याकडेला पलटी झाल्याने क्षणभर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. चाटे पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज धारूर (जि. बीड) येथील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल बस (क्रमांक एमएच १२ एचबी ०११४) इयत्ता चौथी ते आठवीतील ३५ विद्यार्थी, ३ शिक्षक व २ मावशी असे एकूण ४१ जण प्रवास करत होते.
साक्षी गायके (वय १४), अरुणा मैद (वय ३६), सृष्टी गोरे (वय ९), मयुरी विलास पवार (वय १४), गणेश रमेश गोरे (वय १४), प्रीतम देवराव रोडे (वय १५), अजय सतीश नागस (वय ९), विठ्ठल नानोचा हुलगे (वय १३), रितेश विलास बाहये (वय ९), राखू विठ्ठल घोडके (वय ३०), सारिका बालाजी कवके (वय ३४), ओंकार सुधीर गिरी (वय १२), प्रताप प्रकाश फड (वय १२) अशी जखमींची नावे आहेत.
Nashik News : राज्य मार्गावरील खड्डा ठरतोय जीवघेणा, महिनाभरात सहा ते सात अपघात
विद्यार्थ्यांच्या रडण्याचा, ओरडण्याचा आवाज
जखमींवर फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. याशिवाय फुणगूसचे सरपंच अशोक पांचाळ यांनी विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली. तर दुपारच्या जेवण्णाची व्यवस्था सेवानिवृत्त शिक्षक विजय फटकरे यांनी केली, गरजेची प्रत्येक मदत स्थानिकांनी स्वत हुन पुढाकार घेऊन केली. अनोळखी असूनही या मुलांना अपलेब समजून मदत करणारी माणुसकी पाहून अनेकांनी समाधान व्यक्त केले. बालक कृष्णा शिरीषराव वाटे हे बस चालवत होते.
फुग्णगूस येथे बस वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्याकडेला उलटली, अपधात होताच मोठा आवाज झाला आणि बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या रडण्याचा व ओरडण्याचा आवाज परिसरात घुसू लागला, हा आवाज ऐकताच स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले. अपघाताचे दृश्य भयावह असतानाही स्थानिकांनी प्रसंगावधान राखत बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना एकामागून एक सुरक्षितपणे बाहेर काढले, घाबरलेली, रडणारी मुले पाहून अनेकांच्या डोळयात पाणी आले.
लग्न करून घरी जाताना 150 फूट दरीत बस कोसळली अन्…; उत्तराखंड-नेपाळ सीमेवर भीषण Accident
थुळवाडी नागरिकांकडून माणुसकीचे दर्शन
अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था होईपर्यंत बुळवाडी व परिसरातील नागरिकांनी माणुसकीचा उत्तम आदर्श घालून दिला. फटकरे गुरुजी झूठ गुरुजी तसेव चुळवाडीतील ग्रामस्थांनी विद्याथ्यांची व शिक्षकांची राहण्याची संपूर्ण व्यवस्था केली. घाबरलेल्या मुलाना धीर देणे, त्यांबी जेवण-पाण्याची सोय करणे, त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधणे असे मायेचे वातावरण निर्माण करण्यात आले.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






