मुंबई: आज मुंबई येथील वरळी येथे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित विजयी मेळावा पार पडला. या वेळेस महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती होऊ देणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी महायुती सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्र सरकारवर देखील टीका केली आहे.
उद्धव ठाकरे वरळीच्या विजयी मेळाव्यात बोलताना म्हणाले, “गद्दारी करून आमचे सरकार पाडले. तुमचे मालक तिकडे बसले आहेत. त्यांचे बुड चाटण्यासाठी तुम्ही हे सगळ करत आहात. ते म्हणतात म हा महापालिकेचा आहे. अरे म महाराष्ट्राचा आहे. आम्ही महाराष्ट्रही काबीज करू.”
पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, “आमच्यावर सक्ती केली तर अशी शक्ती दाखवू की पुन्हा तुम्ही डोके वर काढणार नाही. आज आपण एकत्र आलो. आता हे पुन्हा काड्या घालण्याचे काम करतील. कोणाच्याही लग्नात भाजपला बोलावू नका. श्रीखंड, बासुंदी पुरी खातील आणि नवरा-बायकोमध्ये भांडणे लावून दुसऱ्या लग्नात जातील. नाही तर पोरीलाच पळवून नेतील.
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना पुन्हा डिवचलं
आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आबहे. आपल्यातील भांडणे विसरून जे आमच्यासाठी एकत्र आले त्यांचेही अभिनंदन. आमच्यातीलं आंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला. एकत्र आलोय आहोत. आम्ही दोघ एकत्र आलो आहोत पण त्यासठी कोण लिंबू कापतंय उतारा टाकत आहे. कोणी टाचण्या मातरतयं कोणी रेडे कापत असतील त्यांना एकच सांगण आहे या अंधश्रद्धेच्या विरोधात आमच्या आजोबांनी लढा दिला होता.
हे सर्व आपणच करून ठेवलं आहे भाषेवरून जर एखादा विषय होतो तो वरवर धरून चालणार नाही. मधल्या काळात आपण सर्वांनी या नतद्रष्टांचा अनुभव घेतला वापरायचं आणि फेकून द्यायंच आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार. वापर करून घेतला. डोक्यावर शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला ओळखत कोण होतं महाराष्ट्रात. राज ठाकरेंनी सर्वांची शाळा काढली पण मोदींची शाळा कोणती ते तर उच्च शिक्षित आहेत. भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात उद्धव ठाकरेंनी हिंदूत्व सोडलं, हिंदुत्व ही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे, कट्टर आणि देशाभिमानी हिंदू आहोत.