Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भोंदूबाबा अशोक खरातवर उद्धव ठाकरेंकडून लाभाची खैरात; शेतकऱ्यांसाठीचे पाणी ‘शिवनिका’ संस्थेकडे वळवले

खरातचा मंत्रालयातील दबदबा किती मोठा होता, याची चर्चा सुरू झाली आहे. त्याला विरोध करणाऱ्यांना दबाव, धमक्या आणि फोन कॉल्स येत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 22, 2026 | 10:52 AM
ठाकरेंचीही खरातवर लाभाची खैरात

ठाकरेंचीही खरातवर लाभाची खैरात

Follow Us
Follow Us:

मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचे रोज नवे कारनामे समोर येत आहेत. खरातच्या राजकीय संबंधांवरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला असला तरी यापूर्वीच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या काळातही खरातवर लाभांची खैरात केल्याचे उघड झाले आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वळवून खरातच्या संस्थेला देण्यात आल्याचा आरोप आता होत आहे.

अशोक खरातच्या या वाढत्या प्रभावाचा फायदा त्याला थेट शासकीय निर्णयांमध्येही झाल्याचे आता स्पष्ट होत आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे असलेल्या ‘श्री शिवनिका संस्थान’चा अध्यक्ष असलेल्या खरातसाठी दारणा धरणातून ३९ लाख लिटर पाणी आरक्षित करण्यात आले होते. ३१ जुलै २०२० रोजी यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला होता. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत होते. शेतकऱ्यांसाठी असलेले पाणी खासगी संस्थानाला वळवण्यात आल्याचा आरोप यामुळे अधिकच बळकट झाला आहे.

दरम्यान, खरातचा मंत्रालयातील दबदबा किती मोठा होता, याची चर्चा सुरू झाली आहे. त्याला विरोध करणाऱ्यांना दबाव, धमक्या आणि फोन कॉल्स येत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. त्याच्या संपर्कात असलेल्या प्रभावशाली व्यक्तीमुळे त्याला अनेकदा संरक्षण मिळाले, असेही बोलले जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामागे मोठे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

अधिकारी-नेते-उद्योजकांचे सिंडिकेट उभारले

अशोक खरात हा एका दिवसात प्रभावशाली झाला नाही. त्याने वर्षानुवर्षे राजकीय वर्तुळात मजबूत संबंध निर्माण केले होते. अनेक मंत्री, खासदार आणि आमदार त्याच्या संपर्कात असल्याचे फोटो आणि व्हिडिओद्वारे समोर आले आहे. या प्रभावाच्या जोरावर तो प्रशासनात हस्तक्षेप करत होता. अधिकाऱ्यांच्या बदल्या घडवत होता आणि विविध ठिकाणी व्यावसायिक भागीदारीही करत असल्याचे समोर आले आहे. या सगळ्याचा वापर करून त्याने अधिकारी-नेते-उद्योजकांचे एक ‘सिंडिकेट’ उभे केल्याची चर्चा आहे.

आधी मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या

भोंदूबाबासोबत महायुती सरकारमधील मंत्र्यांचे फोटो आहेत म्हणून त्यांचे राजीनामे घ्यायला हवेत, असे उच्चरवात बोलणाऱ्या संजय राऊतांना आव्हान देत भाजप प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले की, या न्यायाने तर राऊतांनी आणि उद्धव ठाकरे यांनी हिंमत दाखवून मिलिंद नार्वेकर यांचा आधी राजीनामा घ्यायला हवा आणि मग सत्ताधारी मंत्र्यांबद्दल बोलावे. कारण नार्वेकर यांचे भोंदूबाबासोबत फोटो समोर आले आहेत.

संजय राऊत राजीनामा देणार का?

नाशिकचे संपर्क मंत्री असताना राऊतांसोबतही भोंदूबाबाचे फोटो समोर येतील तेव्हा राऊत खासदारकीचा राजीनामा देणार का, असा खोचक सवाल बन यांनी केला.

Ashok Kharat Case: नीरज जाधवचा खंडणीचा मोह अन् खरातचा खेळ खल्लास! वाचा नाशिक क्राईमची थरारक इनसाईड स्टोरी

Web Title: Uddhav thackeray showers favors on ashok kharat water intended for farmers diverted to the shivnika organization

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • Ashok Kharat
  • Farmers Issue
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल
1

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता
2

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?
3

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून शिंदे गटाचा आज युक्तिवाद; अंतिम निर्णय आता नेमकी कधी?

Maharashtra Drought Assessment: महाराष्ट्रात कसा जाहीर होणार दुष्काळ? राज्य सरकारकडून निकष जारी
4

Maharashtra Drought Assessment: महाराष्ट्रात कसा जाहीर होणार दुष्काळ? राज्य सरकारकडून निकष जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.