Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानपरिषदेच्या निवडणूकीत उध्दव ठाकरेंचे शिलेदार मिलिंद नार्वेकर विजयी, शेकापचे जयंत पाटील पराभूत

उध्दव ठाकरेंचे शिलेदार मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला आहे. तर शरद पवार गटाचा पाठिंबा असलेले शेकापचे जयंत पाटील यांचा अखेर पराभव झाला आहे. या निवडणूकीत महायुतीचे ९ पैकी ९ उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीचे ३ पैकी २ उमेदवार निवडून आले.

  • By नारायण परब
Updated On: Jul 12, 2024 | 08:47 PM
फोटो सौजन्य- Milind narvekar X account

फोटो सौजन्य- Milind narvekar X account

Follow Us
Follow Us:

विधानपरिषद निवडणूक: आज दि. १२ जुलै रोजी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणूकीमध्ये उध्दव ठाकरेंचे शिलेदार मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला आहे. तर शरद पवार गटाचा पाठिंबा असलेले शेकापचे जयंत पाटील यांचा अखेर पराभव झाला आहे. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे गेली अनेक वर्षे स्वीय सचिव म्हणून कार्यरत आहेत. उध्दव ठाकरेंचे राईट हॅंड म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे उध्दव ठाकरेसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती.  पहिल्या पसंतीची २२ मते मिळाल्यानंतर विजयासाठी मिलिंद नार्वेकर यांना एका मताची गरज होती. त्यांना मिळालेल्या दुसऱ्या पसंतीची मतांमुळे त्यांचा विजय झाला.

निवडणूक चुरशीची      

ज्यावेळी ११ सदस्यांच्या जागांसाठी १२ उमेदवारांनी अर्ज भरला त्याच वेळी ही विधानपरिषदेची निवडणूक ही चुरशीची होणार हे ठरल होत. भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाच्या ९ पैकी ९ उमेदवारांचा विजय झाल्याने महाविकास आघाडीच्या कोणत्या तरी उमेदवाराचा पराभव होणार हे निश्चित होत. कॉंग्रेसकडे ३७ सदस्य संख्या असल्याने प्रज्ञा सातव यांचा विजय निश्चित होता. त्या सहजरित्या निवडून आल्या.  मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार गटाचे समर्थन असलेले शेकापचे जयंत पाटील यांच्यातून एक जण जिंकणार होते. मिलिंद नार्वेकर यांना पहिल्या फेरीची २२ मत मिळाली होती तर जयंत पाटील यांना १२ मते मिळाली होती.त्यामुळे मिलिंद नार्वेकर विजयासाठी प्रबळ दावेदार होते अखेर दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या जोरावर ते जिंकून आले.

कॉंग्रेस पक्षाचा विजयामध्ये वाटा

मिलिंद नार्वेकर यांच्या विजयामध्ये ठाकरे गटाला कॉंग्रेस पक्षानेही महत्वाची भूमिका पार पाडली. ठाकरे गटाकडे विधानसभेचे १५ सदस्य होते त्यामुळे त्यांच्याकडे हक्काची १५ मते होती मात्र निवडून येण्यासाठी २३ हून जास्त मतांची गरज होती. यासाठी ठाकरे यांनी कॉंग्रेस पक्षाच्या अतिरिक्त मतांची जुळवाजुळव केली आणि आपल्या शिलेदाराला निवडणून आणले.  मिलिंद नार्वेकर हे पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते आणि त्यांचा वैयक्तिक पातळीवर सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांशी चागंले संबंध असल्याने त्या संबंधाचाही वापर त्यांनी या निवडणूकीत केला असेल.

 

Web Title: Uddhav thackerays shilledar milind narvekar won in legislative council elections shekaps jayant patil lost

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2024 | 08:46 PM

Topics:  

  • Election
  • jayant patil
  • maharashtra
  • milind narvekar
  • Shivsena UBT
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
1

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

Shiv Sena Symbol Case : शिवसेनेच्या पक्षघटनेवर गंभीर सवाल; शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?
2

Shiv Sena Symbol Case : शिवसेनेच्या पक्षघटनेवर गंभीर सवाल; शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात काय सांगितलं?

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
3

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक
4

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.