Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Weather: कराडला अवकाळी पावसाने झोडपलं ; वादळी वारा, गारपीट अन्…, नागरिकांची तारांबळ

मंगळवार 1 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता कराड शहर आणि परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली. पावणे सहा वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट वाढून पावसाचा जोर वाढला. दहा मिनिटे जोरदार गारपीट झाली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 01, 2025 | 09:44 PM
Maharashtra Weather: कराडला अवकाळी पावसाने झोडपलं ; वादळी वारा, गारपीट अन्…, नागरिकांची तारांबळ
Follow Us
Close
Follow Us:

कराड : कराड शहर आणि परिसरात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसात सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा जोरदार कडकडाट सुरू होता. आठवडाभराची विश्रांती घेतल्यानंतर मंगळवारी कराड शहर, परिसरासह तालुक्यात बहुतांशी ठिकाणी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. या पावसात सुमारे दहा मिनिटे गारपीट झाली. त्यामुळे काही ठिकाणी गारांचा खच साचला होता. दरम्यान, या पावसाने हवामानात गारवा निर्माण झाल्याने उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

मंगळवार 1 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता कराड शहर आणि परिसरात वादळी पावसाने हजेरी लावली. यावेळी सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा चांगलाच कडकडाट सुरू होता. पावणे सहा वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट वाढून पावसाचा जोर वाढला. यावेळी सुमारे दहा मिनिटे जोरदार गारपीट झाली. लहान मुले आणि युवकांनी पावसात भिजून गारा वेचण्याचा आनंद लुटला.

Prithviraj Chavan: “… या सर्व परिस्थितीला मुख्यमंत्री जबाबदार”; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका

दरम्यान, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचे चांगलीच तारांबळ उडाली. शहरातील वाहतूकही विस्कळीत झाली होती. तसेच शहरातील भाजी मंडई परिसरात बसलेल्या भाजी विक्रेत्यांसह व्यापारांचीही तारांबळ घडल्याचे दिसून आले. शिवतीर्थ दत्त चौकातील कलिंगड विक्रेत्यांची कलिंगड रस्त्यावर आलेल्या जोरदार पाण्यात काही अंतरापर्यंत वाहत गेली. त्यांची जमवाजमा करून बाकीचा माल वाचवण्यासाठी पावसात त्यांची कसरत सुरू असल्याचे दिसून आले. साडेसहा वाजल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. त्यानंतर शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.

विद्युत पुरवठा खंडित

वादळी पावसाबरोबर जोरदार सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे शहरातील अनेक ठिकाणांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. पावसाने विश्रांती घेतल्यानंतरही काही ठिकाणचा विद्युत पुरवठा पूर्ववत होण्यासाठी मोठा अवधी लागला. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. दरम्यान, काही ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे खंडित झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची पावसात कसरत सुरू होती.

पुणे-बंगलुरु महामार्गावर गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलच्या दर्शनी भागातील काचा गारपीट आणि सोसायट्याच्या वाऱ्यामुळे फुटल्याने हॉटेलमध्ये पावसाचे पाणी शिरले. यामुळे सोपासेट भिजू नुकसान झाले. अन्य साहित्य वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले. कराड शहर परिसरात जोरदार पाऊस सुरू असताना सुमारे दहा मिनिटे मोठ्या प्रमाणावर गारा पडल्या. त्यामुळे ठिकठिकाणी गारांचा खच साचल्याचे दिसून आले. यावेळी लहान मुले आणि युवकांनी पावसात भिजून गारा वेचण्याचा आनंदही लुटल्याचे दिसून आले. तसेच शाळा सुटण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेक शालेय विद्यार्थ्यांनी पावसात भिजण्याचा आनंदही लुटला.

सोसाट्याचे वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू असल्याने येथील पंचायत समिती समोरील झाड कोसळले. तसेच विजय दिवस चौकामध्ये रस्त्यावर मोठे झाड उन्मळून पडल्यामुळे कराड-विटा रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद झाला होता. ही बाब निदर्शनास येतात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह समाजसेवक आणि नागरिकांनी झाड रस्त्यावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. तसेच पार्श्वनाथ बँक परिसर व वाखाण रस्त्यावरही झाड कोसळले. सुपर मार्केट येथेही दुचाकीवर झाड पडल्याने दुचाकीचे नुकसान झाले.

शहरातील भेदा चौकामध्ये एका नेत्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा कमान उभारण्यात आली होती. या पावसात सोसायट्याचा जोरदार वारा सुटल्याने यामध्ये शुभेच्छा कमान कोसळली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईमधील दुकान गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले. यामुळे काही दुकानांमध्ये असलेल्या मालाचे नुकसान झाले. पावसाचे पाणी उपसण्यासाठी गाळे धारकांनी विद्युत मोटारी सुरू केल्या होत्या.

Web Title: Unseasonal rains gale force winds and hailstorms in karad lightning strikes send citizens running

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 09:34 PM

Topics:  

  • Karad
  • maharashtra
  • Maharashtra Rain
  • Satara

संबंधित बातम्या

नोटीसकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्लॉटधारक, डेव्हलपरांना दणका; चाकणमध्ये तिसऱ्या दिवशीही अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई
1

नोटीसकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्लॉटधारक, डेव्हलपरांना दणका; चाकणमध्ये तिसऱ्या दिवशीही अनधिकृत प्लॉटिंगवर कारवाई

रेतीतस्करांविरुद्ध महसूल परिवहन विभागाचे कठोर धोरण! रेतीमाफियांचा वाहन परवाना रद्द होण्याची शक्यता
2

रेतीतस्करांविरुद्ध महसूल परिवहन विभागाचे कठोर धोरण! रेतीमाफियांचा वाहन परवाना रद्द होण्याची शक्यता

जाहिरातदारांना न्यायालयाचा दणका; होर्डिंग्जसाठीच्या जाहिरात दराविरोधातील याचिका फेटाळली
3

जाहिरातदारांना न्यायालयाचा दणका; होर्डिंग्जसाठीच्या जाहिरात दराविरोधातील याचिका फेटाळली

वनराज आंदेकरांच्या हत्येनंतरही आंदेकर कुटुंब निवडणुकीच्या रिंगणात! ‘या’ दोघी लढवणार निवडणूक
4

वनराज आंदेकरांच्या हत्येनंतरही आंदेकर कुटुंब निवडणुकीच्या रिंगणात! ‘या’ दोघी लढवणार निवडणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.