Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांचा मित्र मृग किडा नामशेष होण्याच्या मार्गावर; रासायनिक शेतीमुळे अस्तित्व धोक्यात

मृग नक्षत्राच्या आगमनासोबतच ग्रामीण भागात दिसणारा लाल रंगाचा मखमली मृग किडा अर्थात ‘इंद्रगोप’ हा शेतकऱ्यांचा नैसर्गिक मित्र मानला जातो. हा किडा आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 13, 2026 | 12:30 AM
शेतकऱ्यांचा मित्र मृग किडा नामशेष होण्याच्या मार्गावर; रासायनिक शेतीमुळे अस्तित्व धोक्यात

शेतकऱ्यांचा मित्र मृग किडा नामशेष होण्याच्या मार्गावर; रासायनिक शेतीमुळे अस्तित्व धोक्यात

Follow Us
Follow Us:

देहूगांव : मृग नक्षत्राच्या आगमनासोबतच ग्रामीण भागात दिसणारा लाल रंगाचा मखमली मृग किडा अर्थात ‘इंद्रगोप’ हा शेतकऱ्यांचा नैसर्गिक मित्र मानला जातो. मात्र रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा आणि तणनाशकांचा वाढता व अतिरेकी वापर यामुळे हा उपयुक्त किडा आता नामशेष होण्याच्या मार्गावर असून, मृग नक्षत्राला सुरुवात होऊनही मृग किडा दिसेनासा झाला आहे.

 

मृग नक्षत्राच्या काळात, साधारण जून महिन्यात पहिल्या पावसानंतर जमिनीतून बाहेर येणारा हा लाल मखमली किडा ग्रामीण भागात मृग किडा, इंद्रगोपकिंवा लाल मखमली किडा म्हणून ओळखला जातो. पूर्वी पावसाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात दिसणारा हा किडा आता दुर्मिळ होत चालला आहे. मृग किडा वर्षभर उघड्यावर दिसत नाही. तो बहुतेक काळ जमिनीखाली खोलवर किंवा पालापाचोळ्याच्या थरामध्ये सुप्त अवस्थेत राहतो. मऊ, ओलसर आणि वाळूमिश्रित पिवळसर मातीमध्ये तो स्वतःचे बीळ तयार करून वास्तव्य करतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला पहिली दमदार सर बरसल्यावरच हे किडे जमिनीवर येतात. नर-मादी मिलन आणि अन्नाच्या शोधासाठी ते सकाळी व संध्याकाळी फिरताना दिसतात. कडक उन्हात मात्र ते बाहेर पडत नाहीत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता मृग किडा पिकांचे कोणतेही नुकसान करत नाही. उलट तो शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.

हा किडा पिकांना हानी पोहोचवणाऱ्या विविध कीटकांची अंडी, अळ्या आणि लहान कीटकांवर उपजीविका करतो. मावा, तुडतुडे, कोळी तसेच इतर उपद्रवी किड्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याचे महत्त्वाचे काम तो करतो. याच्या अळ्या टोळ आणि नाकतोड्यासारख्या पिकांची नासाडी करणाऱ्या कीटकांवरही उपजीविका करतात. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने कीड नियंत्रण होऊन शेतकऱ्यांचा रासायनिक औषधांवरील खर्च कमी होण्यास मदत होते.

महिलांकडून होत असे पूजा

मृग किडा जमिनीतील सूक्ष्म परिसंस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. तो अशा सूक्ष्म जीवांवर नियंत्रण ठेवतो जे उपयुक्त बुरशी आणि जीवाणूंना हानी पोहोचवतात. त्यामुळे पालापाचोळ्याचे विघटन वेगाने होऊन जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते आणि जमीन अधिक सुपीक बनते. यामुळे त्याला शेतकऱ्यांचा मित्र मानले जाते. पूर्वी पाऊस पडल्यावर मृग किडा जमिनी बाहेर निघाल्यास शेतकऱ्यांच्या महिला त्याची हळदी कुंकू ने पूजा करत असत.

हे सुद्धा वाचा : आर्थिक संकट असतानाही ‘सल्लागार’ नियुक्तीचा घाट; पिंपरी- चिंचवड महापालिकेत स्थायी समितीचा आयुक्तांच्या आदेशाला हरताळ

नैसर्गिक अधिवास नष्ट

शेतीमध्ये वाढत्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमुळे, कीटकनाशकांमुळे आणि तणनाशकांमुळे मृग किड्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत आहेत. जमिनीतील जैवविविधतेवर याचा विपरीत परिणाम होत असून या उपयुक्त किड्यांची संख्या झपाट्याने घटत आहे. सेंद्रिय शेती आणि पर्यावरणपूरक कृषी पद्धतींचा अवलंब केल्यास या नैसर्गिक मित्राचे संवर्धन होऊ शकते.

Web Title: The mrug beetle is being wiped out due to the use of pesticides and herbicides

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!
2

Ganeshotsav: गणरायाचे रूप शोधण्याची अनोखी कला; मुकुंद दातार यांच्या क्रिएटिव्हने पुणेकर भारावले!

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
3

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय
4

पुण्यनगरीत रांगडा थरार! ‘Spartan Monsoon League’ मध्ये लेजंड्स अन् या संघाचा दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.