Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaduj News : वडूजमध्ये जल्लोषात धर्म ध्वजरोहण; पारंपरिक विधींनी मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात

Vaduj News : वडूज येथे वेदावती माणगंगा पारायण सोहळा समितीच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त रविवार दि.२४ ते ३१ मे अखेर भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 19, 2026 | 04:30 PM
Vaduj Mandap Construction Begins with dharma flag hosting

Vaduj Mandap Construction Begins with dharma flag hosting

Follow Us
Follow Us:

वडूज : खटाव तालुक्यातील वडूज येथे वेदावती माणगंगा पारायण सोहळा समितीच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त रविवार दि.२४ ते ३१ मे अखेर भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. दिग्गज साधू संतांच्या उपस्थित धर्म ध्वज उभारून सोहळ्याचा मंडप उभारण्याचा शुभारंभ करण्यात आला.

Fuel Shortage Rumors: राज्यात अनेक पेट्रोल पंप बंद; ५ दिवसातल्या दुसऱ्या दरवाढीमुळे पंपांवर ड्रम घेऊन गर्दी

यावेळी पुसेगाव येथील सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, अंभेरीचे आचार्य शिवानंद भारती, शामपूरी महाराज औंध, समितीचे अध्यक्ष मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज, आचार्य धीरज शास्त्री वलेकर, प्रा. बंडा गोडसे, वडूज शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गोविंद भंडारे, नगरसेवक अभय देशमुख, धनंजय क्षीरसागर,तानाजीराव वायदंडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना सुंदरगिरी महाराज म्हणाले, अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम कोणा एकट्याचा नाही. कार्यक्रम यशस्वी करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येकाने तन, मन, धनाने योगदान द्यावे.

शिवानंद भारती यांनी मनोगतात, हिंदू धर्मातील धर्म ध्वजाचे महत्व सांगितले. तसेच ध्वजामुळे वारकऱ्यामध्ये चांगली ऊर्जा निर्माण होणार असल्याचे सांगितले. माऊली रणनवरे म्हणाले, सर्वांना बरोबर घेऊन कार्यक्रमाचे आयोजन सुरू आहे. जे बरोबर येतील त्या सर्वांना घेऊन नेटके नियोजन केले जाईल.

यावेळी ह. भ. प. नारायण गंबरे गुरुजी यांचेही मनोगत झाले. ह. भ. ओंकार गुरव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बंडा गोडसे यांनी आभार मानले. कार्यक्रमास ह. भ. प. बाजीराव रणशिंग, ह. भ.प.हणमंत इंदलकर,तानाजी कुंभार, बजरंग भोंडवे महाराज, सुरेश फाळके,टी.के. देवकर , संभाजी पवार,शशिकांत देशमुख, गणपत खाडे, संतोष शहा, भाऊसाहेब खराडे, सोमनाथ वाघमारे, लक्ष्मण पुजारी,संतोष चव्हाण, निलेश आवळे , राजेंद्र दाभाडे आदींसह खटाव माण तालुक्यातील वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी पेडगाव रस्त्यावरील विठ्ठल मंदिरापासून वसंतराव दाभाडे मैदानापर्यंत टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी काढण्यात आली.
दरम्यान दाभाडे मैदानात उभारण्यात आलेल्या ध्वज खांबाची उंची ५२ फूट आहे. तर त्यावर २१ डौलाने फडकणारा २१ फूटी भगवा ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.तर या उभारणी प्रसंगी वडूज येथिल युवा उद्योजक संतोष शहा यांनी ११ हजार १११ रुपयांची देणगी जाहीर केली.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांनो, सरकारला कांदा विकू नका! अनिल घनवट यांचे ‘नाफेड’च्या खरेदीवर बहिष्काराचे आवाहन

Web Title: Vaduj mandap construction begins with dharma flag hoisting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Marathi News
  • Vaduj Nagar Panchayat

संबंधित बातम्या

Chandrapur News: तीन वर्षांपासून पाइपलाइन तयार, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही; धानपिकांचे नुकसान होण्याची भीती
1

Chandrapur News: तीन वर्षांपासून पाइपलाइन तयार, तरी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी नाही; धानपिकांचे नुकसान होण्याची भीती

Nagpur News :यंदा वाढणार फटाक्यांचा दणदणाट ;उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही परवान्यांची संख्या ८०० पार
2

Nagpur News :यंदा वाढणार फटाक्यांचा दणदणाट ;उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही परवान्यांची संख्या ८०० पार

Raigad News: महाड शहरावर पाणीटंचाईचे संकट; टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ पुन्हा येणार? नगरपरिषदेकडून नियोजनावर भर
3

Raigad News: महाड शहरावर पाणीटंचाईचे संकट; टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ पुन्हा येणार? नगरपरिषदेकडून नियोजनावर भर

Parbhani News: सुधारित वेतनवाढीचा प्रस्ताव प्रलंबित, न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
4

Parbhani News: सुधारित वेतनवाढीचा प्रस्ताव प्रलंबित, न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.