
मराठवाड्यात 'वंदे भारत' स्लीपर डब्यांची कारबॉडी निर्मिती (Photo Credit- X)
लातूर कारखान्यात चेन्नई येथील कंपनीकडून तयार झालेल्या कारबॉडी दाखल झाल्या असून, प्रथम श्रेणीच्या डब्यांचे संपूर्ण आरेखन तयार करण्यात आले आहे. या आराखड्यास रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाल्याने, ‘किनेट’ कंपनीच्या सहकार्याने टप्प्याटप्प्याने स्लीपर कोचचे उत्पादन केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन रेक म्हणजे ३२ डबे तयार होतील, त्यानंतर उत्पादन क्षमतेत वाढ केली जाईल.
कारखान्यात एकूण १,९२० डबे तयार होणार असून, पहिला पूर्ण १६ डब्यांचा स्लीपर रेक जून २०२६ पर्यंत तयार होईल. त्यानंतर विविध तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यावर प्रवाशांसाठी सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. डब्यांची देखभाल व दुरुस्ती बंगळूर, दिल्ली व जोधपुर येथे होणार आहे.
‘वंदे भारत’ स्लीपर एक्स्प्रेसचा वेग ताशी १६० किलोमीटर असून, एका रेकमध्ये १६ डबे व ८२३ प्रवाशांची क्षमता असेल. प्रत्येक डब्यात छोटी पॅन्ट्री व तीन शौचालयांची सुविधा देण्यात येणार आहे. एका रेकचा खर्च सुमारे १२० कोटी रुपये आहे. लातूर येथील मराठवाडा रेल कोच फॅक्टरी सुमारे ३५१ एकर क्षेत्रात पसरलेली असून, येथे ११ अत्याधुनिक असेंब्ली स्टेशन, कारबॉडी शॉप, पेंट शॉप, वेअरहाऊस, बोगी व टेस्टिंग कार्यशाळा उभारण्यात आल्या आहेत.
कारखान्याच्या अंतर्गत ८.६ किलोमीटरचा स्वतंत्र चाचणी ट्रॅक असून, याच ठिकाणी डब्यांच्या चाचण्या घेतल्या जाणार आहेत. सध्या येथे सुमारे १० हजार कर्मचारी कार्यरत आहे. मराठवाड्यात पहिल्यांदाच अशा प्रगत रेल्वे डब्यांचे उत्पादन होत असल्याने, लातूर हे रेल्वे उत्पादनाचे राष्ट्रीय केंद्र म्हणून उदयास येत असून, रोजगार, कौशल्यविकास व औद्योगिक वाढीस चालना मिळणार आहे.
मराठवाडा कोच फैक्टरी, लातूर येथील जनसंपर्क अधिकारी अभिषेक मिश्रा यांनी सांगितले आहे की, 66 मार्चपासून प्रत्यक्ष डबे तयार होतील. जून “६६ कारबॉडी उपलब्ध असून, २६ २०२६ पर्यंत पहिला स्लीपर रेक तयार होईल, त्यानंतर पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू होईल.