• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Industrial Crisis Marathwada 602 Factories Closed Sambhajinagar Jalna Beed

Industrial Crisis Marathwada: मराठवाड्यात बेरोजगारीचा स्फोट! ६०२ उद्योग बंद झाल्याने कामगारांचे संसार उघड्यावर

छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यातील १८ वसाहतींमधील ६०२ उद्योग बंद पडले आहेत. हजारो कामगार बेरोजगार झाले असून आरोग्य विभागाच्या सीएसआर निधीवरही याचे सावट आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 20, 2026 | 02:59 PM
मराठवाड्यात बेरोजगारीचा स्फोट! ६०२ उद्योग बंद झाल्याने कामगारांचे संसार उघड्यावर (photo Credit- X)

मराठवाड्यात बेरोजगारीचा स्फोट! ६०२ उद्योग बंद झाल्याने कामगारांचे संसार उघड्यावर (photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • मराठवाड्याच्या उद्योगांना घरघर!
  • ३ जिल्ह्यांतील ६०२ कारखाने बंद
  • हजारो कामगार बेरोजगार, ‘CSR’ निधीवरही संकट
Industrial Crisis Marathwada News: काल सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील सीएसआर निधीअभावी स्थितीवर प्रकाश टाकल्यानंतर आज मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांसह परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग बंद पडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील एकूण १८ औद्योगिक वसाहतींमध्ये ६०२ उद्योग आजारी अवस्थेत बंद असल्याची अधिकृत नोंद आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने सीएसआर निधीसाठी केलेले आवाहन या भागात कितपत परिणामकारक ठरेल, याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. उद्योग बंद पडल्यामुळे हजारो कामगार थेट बेरोजगार झाले असून संबंधित कुटुंबांवर उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतूक, कंत्राटी सेवा, लघुउद्योग तसेच स्थानिक बाजारपेठांवरही त्याचे दुष्परिणाम स्पष्टपणे जाणवत आहेत.

कारवाई होत नाही

बेरोजगारी वाढत असताना उपचाराचा खर्च झेपत नसल्याने सरकारी रुग्णालयांवरील ताण वाढत आहे; मात्र औद्योगिक क्षेत्रातील घसरणीमुळे सामाजिक विकासासाठी वापरता येणारा निधीही मर्यादित होत असल्याचे चित्र आहे. एमआयडीसीकडून बंद कारखान्यांना ‘आजारी (सीक) उद्योग’ म्हणून वर्गीकृत करण्यात येते. नियमानुसार अनुदान घेतलेल्या उद्योगांना किमान १५ वर्षे उत्पादन सुरू ठेवणे बंधनकारक असून, अन्यथा कारवाईची तरतूद आहे. मात्र प्रत्यक्षात बंद उद्योगांवर प्रभावी कारवाई होत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. परिणामी उद्योग बंद होत आहेत.

शाळांमध्ये झळकला ‘हिंद दी चादर’ माहितीपट! गुरुतेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीद समागम वर्षानिमित्त विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह

१. छत्रपती संभाजीनगर जिल्हा (एकूण बंद उद्योग: ४१३)

जिल्ह्यात सर्वाधिक उद्योगांना घरघर लागली असून, चिकलठाणा आणि शेंद्रा सारख्या महत्त्वाच्या वसाहतींना मोठा फटका बसला आहे.

  • चिकलठाणा: १६३
  • शेंद्रा औद्योगिक वसाहत: ८७
  • पैठण: ७५
  • वाळूज: ६५
  • छत्रपती संभाजीनगर शहर परिसर: २३

२. जालना जिल्हा (एकूण बंद उद्योग: १३४)

स्टील हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना जिल्ह्यातही मंदीचे सावट स्पष्ट दिसत आहे.

  • जालना फेज १: ४५
  • जालना शहर परिसर: २४
  • जालना फेज २: १७
  • परतूर: १२
  • भोकरदन: ११
  • जालना फेज ३: ०९
  • जाफराबाद/अंबड: ०९

३. बीड जिल्हा (एकूण बंद उद्योग: ५५)

बीड जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उद्योगांची संख्या कमी असली तरी, उपलब्ध असलेल्या उद्योगांपैकी ५५ युनिट्स कुलूपबंद आहेत.

  • बीड शहर परिसर: ४३
  • आष्टी: ०६
  • माजलगाव: ०३
  • धारूर: ०२
  • पाटोदा: ०१

गुंतवणूक आणि प्रत्यक्ष रोजगारातील दरी अधोरेखित

बंद उद्योगांच्या पुनरुज्जीवनासाठी शासनाने विविध योजना जाहीर केल्या असल्या तरी प्रत्यक्षात कर्जबाजारीपणा, वीजपुरवठ्याच्या समस्या, कच्च्या मालाचा वाढता खर्च, बाजारातील स्पर्धा आणि नवउद्योजकांसाठी भूखंडांचा अभाव यामुळे उद्योग पुन्हा सुरू होण्याची प्रक्रिया कठीण ठरत आहे. तंत्रज्ञानातील वेगवान बदल आणि जागतिक स्पर्धेमुळे अनेक लघु व मध्यम उद्योग टिकू न शकल्याचेही वास्तव पुढे येत आहे.

दरम्यान, मार्च २०२४ मध्ये विकलठाण्यात झालेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत २४१ कंपन्यांसोबत ४,६६१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले होते. या गुतवणुकीतून १५.६६५ रोजगारनिर्मितीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती, मात्र त्याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग बंद असल्याचे चित्र समोर आल्याने, गुंतवणूक आणि प्रत्यक्ष रोजगार यातील दरी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
औद्योगिक क्षेत्रातील ही स्थिती कायम राहिल्यास बेरोजगारी, स्थलांतर आणि सामाजिक अस्थैर्य वाढण्याची शक्यता असून, आरोग्य क्षेत्रासाठी अपेक्षित असलेला सीएसआर निधीही कागदावरच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उद्योग पुनरुज्जीवन, कामगार पुनर्वसन आणि सामाजिक निधीच्या वापरासाठी समन्दयित धोरणाची तातडीने गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Chhatrapati Sambhajinagar: सामायिक विहिरीच्या पाण्यावरून वाद, लहान भावासह कुटुंबीयांची मारहाण; कंटाळून ज्येष्ठ भावाची आत्महत्या

Web Title: Industrial crisis marathwada 602 factories closed sambhajinagar jalna beed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Beed
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Jalna
  • Marathwada

संबंधित बातम्या

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! मुकुंदवाडी परिसरात टोळक्याचा गोळीबार; नेमकं प्रकरण काय?
1

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! मुकुंदवाडी परिसरात टोळक्याचा गोळीबार; नेमकं प्रकरण काय?

Beed Accident: देवदर्शनाला निघालेल्या तरुणावर काळाचा घाला; बीडमध्ये ट्रकच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू
2

Beed Accident: देवदर्शनाला निघालेल्या तरुणावर काळाचा घाला; बीडमध्ये ट्रकच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

शाळांमध्ये झळकला ‘हिंद दी चादर’ माहितीपट! गुरुतेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीद समागम वर्षानिमित्त विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह
3

शाळांमध्ये झळकला ‘हिंद दी चादर’ माहितीपट! गुरुतेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीद समागम वर्षानिमित्त विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह

एमआयएमचा मोठा निर्णय! १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद निवडणूक लढवणार; आजपासून उमेदवारी अर्ज वाटप
4

एमआयएमचा मोठा निर्णय! १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद निवडणूक लढवणार; आजपासून उमेदवारी अर्ज वाटप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navi Mumbai News : “भाजपाने बौद्ध समाजाला न्याय दिला नाही”; अज्ञातांनी लावलेल्या बॅनरने वेधले लक्ष

Navi Mumbai News : “भाजपाने बौद्ध समाजाला न्याय दिला नाही”; अज्ञातांनी लावलेल्या बॅनरने वेधले लक्ष

Jan 20, 2026 | 04:39 PM
World War: जगावर भयंकर Attack होणार! ISIS चे तब्बल 1500 क्रूर दहशतवादी फरार? सिरिया अन् आता…

World War: जगावर भयंकर Attack होणार! ISIS चे तब्बल 1500 क्रूर दहशतवादी फरार? सिरिया अन् आता…

Jan 20, 2026 | 04:32 PM
BMC Mayor : महायुतीचा वाद पोहचला दिल्ली दरबारी! एकनाथ शिंदेंची थेट वरिष्ठांकडे तक्रार

BMC Mayor : महायुतीचा वाद पोहचला दिल्ली दरबारी! एकनाथ शिंदेंची थेट वरिष्ठांकडे तक्रार

Jan 20, 2026 | 04:30 PM
Maval Politics: मावळचा विकास की केवळ घोषणाबाजी? सुनील शेळके यांचा बाळा भेगडेंना थेट सवाल

Maval Politics: मावळचा विकास की केवळ घोषणाबाजी? सुनील शेळके यांचा बाळा भेगडेंना थेट सवाल

Jan 20, 2026 | 04:23 PM
Raigad Tourism :- वाली चिंचवाडी गाव- निसर्ग, परंपरा आणि श्रद्धेचा संगम

Raigad Tourism :- वाली चिंचवाडी गाव- निसर्ग, परंपरा आणि श्रद्धेचा संगम

Jan 20, 2026 | 04:23 PM
500+ किमी रेंज, 8 वर्षाची वॉरंटी अन् बरंच काही! भारतात Toyota ची पहिली Electric SUV सादर

500+ किमी रेंज, 8 वर्षाची वॉरंटी अन् बरंच काही! भारतात Toyota ची पहिली Electric SUV सादर

Jan 20, 2026 | 04:20 PM
ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर शार्कचा थरार; ४८ तासांत चार हल्ले, सर्फर जखमी

ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर शार्कचा थरार; ४८ तासांत चार हल्ले, सर्फर जखमी

Jan 20, 2026 | 04:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : श्री जगदीश्वराचा आशीर्वाद घेऊन शिवसेना प्रचाराचा शुभारंभ; सुषमा गोगावलेंची विशेष उपस्थिती

Raigad : श्री जगदीश्वराचा आशीर्वाद घेऊन शिवसेना प्रचाराचा शुभारंभ; सुषमा गोगावलेंची विशेष उपस्थिती

Jan 20, 2026 | 02:33 PM
Ratnagiri : रत्नागिरी राष्ट्रवादीच्या(अ.प) दोन पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

Ratnagiri : रत्नागिरी राष्ट्रवादीच्या(अ.प) दोन पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनामा

Jan 20, 2026 | 02:31 PM
Parbhani News : महापालिकेत अपयश आलेले असतानाही भाजपला इच्छुकांची मोठी पसंती

Parbhani News : महापालिकेत अपयश आलेले असतानाही भाजपला इच्छुकांची मोठी पसंती

Jan 19, 2026 | 08:00 PM
Akola Muncipal : हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जया गेडाम यांनी निवडणुकीत मिळवला विजय

Akola Muncipal : हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जया गेडाम यांनी निवडणुकीत मिळवला विजय

Jan 19, 2026 | 06:40 PM
Kolhapur Muncipal Corporation : “स्वतंत्र लढले असते तर कोल्हापूरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असता”- सतेज पाटील

Kolhapur Muncipal Corporation : “स्वतंत्र लढले असते तर कोल्हापूरकरांनी करेक्ट कार्यक्रम केला असता”- सतेज पाटील

Jan 19, 2026 | 05:48 PM
Chiplun : चिपळूणकरांच्या कोटींच्या गुंतवणुकीला चुना; नेमकं प्रकरण काय ?

Chiplun : चिपळूणकरांच्या कोटींच्या गुंतवणुकीला चुना; नेमकं प्रकरण काय ?

Jan 19, 2026 | 05:42 PM
Ahilyanagar :  महानगरपालिकेत महायुतीचा विजयोत्सव, महापौर निवडीबाबत विखेंचे सूचक विधान

Ahilyanagar : महानगरपालिकेत महायुतीचा विजयोत्सव, महापौर निवडीबाबत विखेंचे सूचक विधान

Jan 19, 2026 | 05:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.