Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai: मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता! वसईतील ‘त्या’ चिमुकल्याच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीची मदत मंजूर

सदर घटनेची माहिती मिळताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत विशेष बाब म्हणून मदत करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या सूचनांनुसार संबंधित रुग्णास तात्काळ आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 07, 2026 | 09:46 PM
वसईतील 'त्या' चिमुकल्याच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीची मदत मंजूर (Photo Credit- X)

वसईतील 'त्या' चिमुकल्याच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीची मदत मंजूर (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता!
  • वसईतील ‘त्या’ चिमुकल्याच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीची मदत मंजूर
मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: वसई पश्चिम येथील चार वर्षीय निरागस बालकावर क्रूर आणि अमानुष मारहाण झाल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या विघ्नेशच्या उपचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे. सध्या चिमुकल्याची प्रकृती स्थिर असल्याचे पालकांकडून सांगण्यात आले.

३० मार्च २०२६ रोजी सायंकाळी सोसायटीच्या आवारात मित्रांसोबत खेळत असलेल्या विघ्नेश अतुल कोंढारे (वय ४) या चिमुकल्यावर आरोपी संदीप पवार याने अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात विघ्नेशच्या डोक्याला आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.

विघ्नेशचे वडील अतुल कोंढारे हे फरशी फिटिंगचा छोटासा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने उपचाराचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर होता. अशा वेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडून आर्थिक मदत मंजूर करण्यात आली असून, बालकाच्या संपूर्ण उपचाराचा खर्च या निधीतून करण्यात येत आहे. सध्या विघ्नेशवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली मोफत उपचार सुरू आहेत. या मदतीबद्दल विघ्नेशचे वडील अतुल कोंढारे म्हणाले, “मुख्यमंत्री सहाय्यता निधीने केलेल्या या सहाय्यामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे आणि आता विघ्नेशची प्रकृती स्थिर झाली आहे.”

सदर घटनेची माहिती मिळताच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत विशेष बाब म्हणून मदत करण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या सूचनांनुसार संबंधित रुग्णास तात्काळ आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात आले आहे. गरजू रुग्णांनी वैद्यकीय आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीशी संपर्क साधण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८०० १२३ २२११ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ई-गव्हर्नन्समध्ये धाराशिवचा डंका! राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावला तृतीय क्रमांक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

काय घडलं नेमकं?

वसई पश्चिमेच्या अनुपम घर संकुल या सोसायटीत राहणारे अतुल कोंढारे यांचा त्याच सोसायटीत राहणारा व व्यवसायाने रिक्षा चालवणारा आरोपी संदीप पवार याच काही दिवसापूर्वी किरकोळ अंतर्गत वाद झाला होता. सोमवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान सोसायटीतील लहान मुलं खेळत असताना, अतुल कोंढारे यांचा चार वर्षाचा मुलगा विघ्नेश हा देखील मुलांबरोबर खेळत होता. खेळता खेळता विघ्नेश हा रिक्षात बसला. त्याचवेळी आरोपी संदीप हा रिक्षाजवळ आला आणि त्याने इतर मुलांना हाकलून दिलं. त्याने विघ्नेशला पकडून त्याचं डोक रिक्षाच्या मिटरच्या बाजूला असलेल्या लोखंडी अँगलवरती आपटलं. त्याला रिक्षातून पायाला धरून जोरात खेचलं आणि त्याच पाय पकडून जोरात हवेत भिरकावत डोक्यावर आपटलं.

एवढ्यावरच न थांबता संदीपने त्याला पायला धरुन फरफटत नेलं. आणि पहिल्या मजल्यावरील शिडीवर घेवून जाऊनही मारहाण केली. विघ्नेशची आजी त्याला सोडवण्यासाठी गेली असता, तिला ही या नराधमाने मारहाण केली. सोसायटीच्या सीसीटीव्हीत हे दृश्य कैद झाले असून, याचा संताप आता व्यक्त होत आहे.

रक्ताच्या उलट्या

त्यानंतर या सगळ्याबाबत शेजाऱ्यांनी अंगावर काटा आणणारी माहिती सांगितली. संदीप याने चिमुकल्या विघ्नेशला दोन- तीनवेळा जमिनीवर जोरात आपटले. एखादा कपडा धुताना आपटावा तसा त्या लहानग्या चिमुरड्याला आपटले. त्याला रुग्णालयात नेले तेव्हा विघ्नेशने रक्ताच्या उलट्या केल्या.

गुन्हा दाखल

संदीपला आपल्या कृत्याबद्दल जरासाही पश्चाताप वाटत नव्हता. ‘मी बदला घेतला’ अशा आवारभावात तो निर्लज्जपणे सोसायटी सदस्यांना हा सगळा प्रकार सांगत होता. आरोपी संदीप वर वसई पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम 109(1), 115(2), 351,(3), 352 सह अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) 201 चे कलम 75 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

अवकाळीचा तडाखा! Maharashtra Government ने उघडली तिजोरी; शेतकऱ्यांना 128 कोटींची मदत जाहीर

Web Title: Vasai child assault vighnesh medical aid cm relief fund maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 09:46 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Mumbai
  • vasai

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली, आधारभूत किमतींसाठी कठोर कायदा करा; जुन्नर तालुक्यातून सरकारला आर्त हाक
1

शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली, आधारभूत किमतींसाठी कठोर कायदा करा; जुन्नर तालुक्यातून सरकारला आर्त हाक

Tuljapur News : तुळजापुरात तणाव, नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्यावर हल्ला; नेमकं काय घडलं?
2

Tuljapur News : तुळजापुरात तणाव, नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्यावर हल्ला; नेमकं काय घडलं?

वानखेडे स्टेडियमवरील ‘सलाम मुंबई’वरून नवा वाद; भाजप युवा मोर्चा आक्रमक, स्क्रीनवर ‘नमस्कार मुंबई’ लिहिण्याची मागणी
3

वानखेडे स्टेडियमवरील ‘सलाम मुंबई’वरून नवा वाद; भाजप युवा मोर्चा आक्रमक, स्क्रीनवर ‘नमस्कार मुंबई’ लिहिण्याची मागणी

देशात डिझेल टंचाईचा हाहाकार; ६० लाख ट्रक रस्त्यांवरच ठप्प, दररोज २१ अब्ज रुपयांचे नुकसान अन्….
4

देशात डिझेल टंचाईचा हाहाकार; ६० लाख ट्रक रस्त्यांवरच ठप्प, दररोज २१ अब्ज रुपयांचे नुकसान अन्….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.