पुणे : महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) दोन लाख कोटी रुपये गुंतवणूक असलेला प्रकल्प गुजरात (Gujrat) राज्यात गेल्यामुळं सध्या राज्यात बरेच आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु आहे. दरम्यान, यावर आता विरोधक आक्रमक होत शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnvis government) टिका करत आहेत. सरकारच्या निषेधार्थ मोर्चे व आंदोलन काढत असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुण्यात पत्रकार परिषदे घेत, शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलाच समाचार घेतला आहे. (Sharad pawar press conference in pune)
वेदांता महाराष्ट्र बाहेर जाणं हे दुर्दैव
दरम्यान, वेदांता हा प्रकल्प सुरुवातीला तळेगावात होणार होता, पण अचानक असं काय झालं आणि हा प्रकल्प गुजरातमध्ये का गेला समजत नाही. गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र हा देशात अव्वल क्रंमाकावर राहिला आहे. चर्चा बंद करुन आता नवीन काय करता येतं का हे पाहावे. महाराष्ट्राच्या नेतृत्वाने नेहमीच राज्यात मोठी गुंतवणूक आणली आहे. उद्योगासाठी महाराष्ट्रातील वातावरण पोषक आहे. अस असताना वेदांता हा प्रकल्प महाराष्ट्रातून जाणं हे दुर्दैव असल्याची घणाघाती टिका शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.
…तर फुग्याचं अमिष दाखविण्यासारखं आहे
मविआ सरकारच्या काळात शिंदे, सामंत हे मंत्री होते, तेच आता उलट आरोप करत आहेत, वेदांता-फॉक्सकॉनचा बदल्यात दुसऱ्या प्रकल्पाच्या चर्चांना अर्थ नाही, हे तर रडणाऱ्याला मोठ्या फुग्याचं अमिष दाखविण्यासारखं आहे, अशी जोरदार टिका शिंदे-फडणवीस यांच्या नव्या आश्वासनावर पवार यांनी केली.
मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गुजरात दौरे अधिक
तळेगाव हिच वेदांता या प्रकल्पासाठी योग्य जागा होती, केंद्रात मोदींची सत्ता असताना देशातील विशिष्ट राज्यानाच याचा फायदा होतोय, मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांचे गुजरातचे दौर वाढलते, अशी मोदींवर सुद्धा पवार यांनी टिका केली. दरम्यान, वेदांता प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात येण अशक्य, आताचे सरकारने मविआवर टिका करणे चुकीचे आहे. जर काय मोदींनी पुन्हा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणला तर त्याचे स्वागतच करु, असं सुद्धा पवार म्हणाले.
सगळी यंत्रणा थंड झाली आहे का?
दरम्यान, याचे ठाकरे सरकारवर खापर फोडणे चुकीचं आहे. याआधी सुद्धा महाराष्ट्रातून असे प्रकल्प गेले आहेत. आता फक्त काय झाडी…काय डोंगार…हेच ऐकायला मिळतं, सगळी यंत्रणा थंड झाली आहे का? असा मनात प्रश्न येतो. महाराष्ट्रात राज्यकर्त्यांचं लक्ष नाही असं वाटायला लागलंय. असा नाराजीचा सूर राज्यकर्त्यांबद्दल पवारांनी काढला.