(फोटो सौजन्य: Pinterest)
इंडियन टुरिस्टची पहिली पसंत बनत आहे Vietnam, अवघ्या 50,000 रुपयांत घ्या लग्झरी ट्रिपची मजा
८०० हून अधिक संगमरवरी मंदिरे
शत्रुंजय टेकडीवर उभारलेले हे विशाल तीर्थक्षेत्र आपल्या भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. येथे सुमारे ८६० पेक्षा अधिक संगमरवरी मंदिरे आहेत, ज्यांची कोरीव रचना आणि स्थापत्यकला अप्रतिम आहे. जैन परंपरेनुसार आयुष्यात किमान एकदा तरी येथे दर्शन घेणे मोक्षप्राप्तीसाठी महत्त्वाचे मानले जाते. २४ तीर्थंकरांपैकी नेमिनाथ वगळता इतर २३ तीर्थंकरांनी या पर्वताला पावन केले, अशी श्रद्धा आहे.
तपस्येसमान चढाई
मुख्य मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण ३५०० पायऱ्या चढाव्या लागतात. ही चढाई श्रद्धा, संयम आणि निष्ठेची परीक्षा घेणारी मानली जाते. अनेक भाविक पहाटे लवकर प्रवास सुरू करून सूर्यास्तापूर्वी दर्शन पूर्ण करतात.
रात्री मुक्कामास मनाई
या पवित्र स्थळाला देवतांचे निवासस्थान मानले जाते. त्यामुळे सूर्यास्तानंतर टेकडीवर कोणीही थांबण्यास परवानगी नाही. अगदी मंदिरातील सेवेकरी आणि पुजाऱ्यांनाही संध्याकाळ होण्यापूर्वी खाली उतरावे लागते. या परंपरेमुळे या ठिकाणाची पवित्रता आणि शिस्त आजही जपली गेली आहे.
मुख्य मंदिर आणि धार्मिक महत्त्व
येथील प्रमुख मंदिर पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांना समर्पित आहे. हे स्थान श्वेतांबर मूर्तिपूजक जैन समुदायासाठी अत्यंत पवित्र मानले जाते. तसेच दिगंबर जैन परंपरेचेही येथे मंदिर आहे. संपूर्ण परिसर धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असून त्याची शिल्पकला आणि वास्तुशैली जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते.
भारताची सायलंट सिटी माहिती आहे का? इथे ना गाड्यांचा ना ट्रॅफिकचा आवाज येतो… कसे राहतात लोक?
पालिताणा येथे कसे पोहोचावे?
हवाई मार्ग: सर्वात जवळचे विमानतळ भावनगर विमानतळ असून ते पालिताणापासून सुमारे ५५ किमी अंतरावर आहे.
रेल्वे मार्ग: पालिताणा हे भावनगर तसेच मुंबई यांसारख्या प्रमुख शहरांशी रेल्वेमार्गाने जोडलेले आहे.
रस्ता मार्ग: गुजरातमधील अनेक शहरांमधून पालिताणाकडे जाण्यासाठी उत्तम रस्ते सुविधा उपलब्ध आहेत.
आस्था, स्थापत्यकला आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचा संगम अनुभवायचा असेल, तर पालिताणा हे एक अविस्मरणीय तीर्थक्षेत्र ठरते.






