शासकीय धान्य गोदामाच्या पाठीमागे चिंचकर यांचे टायर्सचे दुकान आहे. या मार्गावरून धान्य गोदामातील ट्रक तसेच अन्य वाहनांची सातत्याने ये-जा सुरू असते. मात्र, अनेक वर्षांपासून रस्त्यावर कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने रस्ता खड्डेमय आणि खराब झाला आहे. त्यातच पावसामुळे संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने वाहनांची ये-जा धोकादायक बनली आहे.
राहुल टायर्समध्ये टायर्स खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांनाही या खराब रस्त्याचा फटका बसत आहे. चिखलामुळे वाहने घसरण्याची शक्यता असून, एखादा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. धान्य गोदामातील अवजड वाहनांची सततची वाहतूक आणि रस्त्याच्या देखभालीचा अभाव यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.
Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित विभागाला पाहणी व दुरुस्तीच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी चिंचकर यांनी केली आहे. रस्त्याच्या सद्यस्थितीचे छायाचित्रेही त्यांनी अर्जासोबत जोडली आहेत.
शासकीय धान्य गोदामासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी दररोज अवजड वाहनांची वर्दळ असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष का केले जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था आणखी बिकट होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
वाई शहरात साथीच्या रोगांचे सावट, नगरपरिषदेच्या निष्क्रियतेवर नागरिक संतप्त






