Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai News: सुरूर-पोलादपूर रस्त्याची दयनीय अवस्था; लोकप्रतिनिधी गप्प, थेट वाहतूक पोलिसानेच हातात फावडे घेऊन बुजवला खड्डा

वाई-महाबळेश्वर-पाचगणी पर्यटनस्थळाला जोडणाऱ्या सुरूर-पोलादपूर रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे अखेर वाई वाहतूक पोलीस हवालदार गोरखनाथ दाभाडे यांनी स्वतः खड्डा बुजवत यंत्रणेचे वाभाडे काढले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 29, 2026 | 02:47 PM
Wai News: सुरूर-पोलादपूर रस्त्याची दयनीय अवस्था; लोकप्रतिनिधी गप्प, थेट वाहतूक पोलिसानेच हातात फावडे घेऊन बुजवला खड्डा
Follow Us
Follow Us:
  • सुरूर–पोलादपूर रस्त्याचा बोजवारा
  • ट्रॅफिक पोलिसाने हातात फावडे घेत बुजवला खड्डा
  • निकृष्ट कामावर संतापाचा उद्रेक
वाई: महाबळेश्वर–पाचगणी या जागतिक कीर्तीच्या पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या सुरूर–पोलादपूर मार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत असून, शासनाच्या आशीर्वादामुळेच संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. कोट्यवधी रुपयांच्या रस्ते कामात निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याने प्रवाशांचे हाल होत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात वाई तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि धोकादायक परिस्थितीमुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर वाई वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार गोरखनाथ दाभाडे यांनी स्वतः हातात फावडे घेऊन खडी टाकत मोठा खड्डा बुजवला. वाहतुकीचा धोका कमी करण्यासाठी पोलिसाला रस्ता दुरुस्त करण्याचे काम करावे लागणे ही संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारासाठी मोठी शरमेची बाब असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

गांधी पेट्रोल पंपाजवळ सुरू असलेल्या रस्ते कामावरही नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. टप्प्याटप्प्याने सुरू असलेल्या या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा आरोप होत असून, कामाची गुणवत्ता अत्यंत सुमार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, या प्रकाराविरोधात एकाही लोकप्रतिनिधीने किंवा राजकीय नेत्याने ठोस भूमिका घेतलेली नसल्याने संताप अधिकच वाढला आहे.

शिरवळमध्ये १५ ग्रॅम एमडी जप्त; पाठलाग करून २१ वर्षीय युवकाला अटक

प्रसारमाध्यमांनी वारंवार या रस्त्याच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकूनही संबंधित ठेकेदारावर कोणतीही प्रभावी कारवाई होत नसल्याने “या ठेकेदाराच्या पाठीशी नेमका कोणाचा वरदहस्त आहे?” असा सवाल वाई शहरासह संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. संबंधित कामाची तसेच त्यामागील प्रशासकीय व राजकीय जबाबदारीची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे. या रस्त्याच्या कामामुळे गेल्या वर्षी परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते. शेतातील सोयाबीनसह इतर पिकांवर धुळीचा जाड थर साचल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. मात्र तरीही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.

महाबळेश्वर पाचगणीकडे जाणारे अनेक पर्यटक आता या मार्गाचा वापर टाळून पर्यायी मार्गाने प्रवास करत असल्याने पर्यटनावरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यटनाचा दर्जा उंचावण्याच्या घोषणा करणाऱ्या शासनाने प्रत्यक्षात या महत्त्वाच्या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीदवाक्याला साजेसा आदर्श ठेवत वाहतूक सुरळीत ठेवण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरून खड्डा बुजवणारे ट्रॅफिक पोलीस हवालदार गोरखनाथ दाभाडे यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मात्र पोलिसांनी रस्ते दुरुस्त करावेत आणि संबंधित यंत्रणा मात्र हातावर हात धरून बसावी, ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

दरम्यान, शासनाने संबंधित ठेकेदाराच्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, संपूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीने पुन्हा तयार करावा आणि या कामाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांनाही जाब विचारावा, अशी जोरदार मागणी वाई शहरासह संपूर्ण तालुक्यातून होत आहे.

Satara News : वाई मुख्य रस्त्याला नदीचे स्वरूप, नगरपालिकेची बंदिस्त गटारे योजना सपशेल फेल

Web Title: Wai mahabaleshwar highway potholes traffic police gorakhnath dabhade repairs road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Satara
  • Traffic
  • Wai
  • Wai News

संबंधित बातम्या

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
1

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? पाम बीच रोडवर उड्डाणपुलांचा पर्याय
2

Navi Mumbai News: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीला मिळणार ब्रेक? पाम बीच रोडवर उड्डाणपुलांचा पर्याय

Wai – एम.आय.डी.सी.तील ‘अर्थव फाउंड्री’विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे १५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा
3

Wai – एम.आय.डी.सी.तील ‘अर्थव फाउंड्री’विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे १५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा

बावधनमध्ये ‘मंगलमूर्ती सोशल क्लब’चा उपक्रम! ‘नाना-नानी पार्क’ची मुहूर्तमेढ; समाजऋण फेडण्यासाठी वृक्षारोपण
4

बावधनमध्ये ‘मंगलमूर्ती सोशल क्लब’चा उपक्रम! ‘नाना-नानी पार्क’ची मुहूर्तमेढ; समाजऋण फेडण्यासाठी वृक्षारोपण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.