Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : वर्ध्यात अंगणवाडी सेविका-मदतनिसांचा जेलभरो; 30 हजार वेतनासह विविध मागण्यांसाठी सरकारविरोधात एल्गार

वर्ध्यात आयटक आणि सिटू संलग्न संघटनांच्या वतीने अंगणवाडी सेविका, मदतनिस आणि योजना कामगारांनी विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन केले. किमान 30 हजार रुपये वेतन, पेन्शन, सामाजिक सुरक्षा आणि नियमितीकरणाच्या मागण्या करण्यात आल्या.

  • By विवेक
Updated On: Aug 11, 2026 | 03:01 PM
wardha protest

wardha protest

Follow Us
Follow Us:
  • वर्ध्यात अंगणवाडी सेविका-मदतनिसांचा जेलभरो आंदोलन
  • किमान 30 हजार रुपये वेतन आणि पेन्शनची मागणी
  • नियमितीकरणासह ईएसआय, ईपीएफ आणि ग्रॅच्युईटी लागू करण्याची मागणी
 

वर्धा : अंगणवाडी सेविका, मदतनिस आणि शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांनी आपल्या विविध न्याय्य मागण्यांसाठी सोमवारी वर्ध्यात जोरदार आंदोलन केले. आयटक आणि सिटू संलग्न विविध संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चातून सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत मागण्यांचे निवेदन साद केले. यावेळी बजाज चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले.

सिटूच्या वतीने विठ्ठल मंदिर रोड परिसरातील सिटू कार्यालयातून मोर्चाला सुरुवात झाली. तर आयटकच्या वतीने दयालनगर रेल्वे स्टेशन परिसरातून मोर्चा काढण्यात आला. दोन्ही मोर्चे बजाज चौकात आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जेलभरो आंदोलन केले. विठ्ठल मंदिर परिसरातून निघालेला मोर्चा बढे चौक, बजाज चौक आणि इतवारी बाजार चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पोहोचला. पोलिसांनी येथे आंदोलनकर्त्यांना अडविल्यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले.

या वेळी विविध पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त करत केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. योजना कामगारांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन त्यांची आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली.

Wardha News : घरगुती गॅस सिलिंडरचा होतोय व्यावसायिक वापर; ४३ ठिकाणी धाडी, ६७ सिलिंडर केले जप्त

काय आहेत आंदोलकांच्या प्रमुख मागण्या ?

संसदेत ११ मार्च २०२५ रोजी देण्यात आलेल्या आश्वासनानुसार वाढीव प्रोत्साहन भत्ता थकबाकीसह तातडीने देण्यात यावा, ४५ व्या आणि ४६ व्या भारतीय कामगार परिषदेच्या शिफारशी लागू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

नियमितीकरण होईपर्यंत योजना कामगारांना किमान ३० हजार रुपये वेतन देण्यात यावे. मूळ वेतन ग्राहक किंमत निर्देशांकाशी जोडावे आणि प्रोत्साहन रकमेचा दर दरवर्षी सुधारित करावा, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

याशिवाय सहा महिन्यांची प्रसूती रजा, २० दिवसांची सवेतन किरकोळ रजा आणि वैद्यकीय रजा मंजूर करावी, निवृत्तीपर्यंत पेन्शन व्यवस्था लागू करावी, तसेच तोपर्यंत किमान १० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान आणि इतर सामाजिक सुरक्षा लाभ द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

मासिक १० हजार रुपये पेन्शन लागू करावी, आरोग्यसेवेसह सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण थांबवावे आणि चारही कामगार संहिता तसेच श्रमशक्ती नीती २०२० मागे घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

योजना कामगारांना कामगार कायद्यांतर्गत संरक्षणाची मागणी

आशा-गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका-मदतनिस आणि इतर योजना कामगारांना कामगार कायद्याच्या कक्षेत आणून ईएसआय, ईपीएफ, भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युईटीसारखे सामाजिक सुरक्षा लाभ लागू करावेत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

गटप्रवर्तकांना पर्यवेक्षकाचा दर्जा देऊन सेवेत कायम करावे, ५ जुलै २०२४ रोजी राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेल्या एक हजार रुपयांच्या वाढीचा शासन निर्णय तातडीने काढावा, तसेच उमेद प्रकल्पांतर्गत कार्यरत सीआरपींना दरमहा २५ हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणीही करण्यात आली. महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, यासह विविध मागण्या आंदोलकांनी मांडल्या.

Wardha News : सोयाबीनचे पंचनामे रखडल्याने शेतकरी संतप्त; कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून निषेध

मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग

सिटूच्या मोर्चाचे नेतृत्व यशवंत झाडे, भैय्या देशकर, सुनील घिमे, दुर्गा काकडे, ममता खडतकर, अलका जराते, अर्चना घुगरे, सुवर्णा इंगोले, शुभांगी मलवे, अर्चना मोकाशी, गुंफा कटारे, शमीम खाँ पठाण आणि वैशाली मुंजेवार यांनी केले. आयटकच्या मोर्चाचे नेतृत्व दिलीप उटाणे, मनोहर पचारे, वदना कोळणकर, मैना नन्नोरे, महेश दुबे, अल्का भानसे, अरुणा नागोसे, विजया पावडे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी केले. आंदोलनात अंगणवाडी सेविका, मदतनिस, शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या महिला आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांच्या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेते आणि या मागण्यांवर तोडगा कधी निघतो, याकडे आता आंदोलनकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Wardha anganwadi sevika madanis jail bharo andolan demands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • Anganwadi Sevika
  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : घरगुती गॅस सिलिंडरचा होतोय व्यावसायिक वापर; ४३ ठिकाणी धाडी, ६७ सिलिंडर केले जप्त
1

Wardha News : घरगुती गॅस सिलिंडरचा होतोय व्यावसायिक वापर; ४३ ठिकाणी धाडी, ६७ सिलिंडर केले जप्त

Wardha News : सोयाबीनचे पंचनामे रखडल्याने शेतकरी संतप्त; कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून निषेध
2

Wardha News : सोयाबीनचे पंचनामे रखडल्याने शेतकरी संतप्त; कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून निषेध

Wardha News : १० वसतिगृहात ३२७ जागा रिक्त, शासकीय वसतिगृहात ९२५ जागा; ५९८ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
3

Wardha News : १० वसतिगृहात ३२७ जागा रिक्त, शासकीय वसतिगृहात ९२५ जागा; ५९८ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

Wardha News : स्कूल व्हॅनला धडक ६ विद्यार्थी गंभीर, १५ जखमी; वर्धा-मदणी मार्गावरील करंजी-काजी परिसरातील घटना
4

Wardha News : स्कूल व्हॅनला धडक ६ विद्यार्थी गंभीर, १५ जखमी; वर्धा-मदणी मार्गावरील करंजी-काजी परिसरातील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.