Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LPG सिलेंडरच्या किमतींवर होणार परिणाम? सरकारने LNG सप्लायवरील बंदी हटवली; जाणून घ्या नेमकं काय बदलणार

भारत सरकारने लिक्विफाइड नॅशनल गॅसच्या पुरवठ्यावरील निर्बंध किंवा बंदी उठवण्याचा एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या आंतरराष्ट्रीय ऊर्जा घडामोडी आणि देशांतर्गत एलपीजी गॅस सिलिंडर किमतींवर परिणाम होणार का? हा मोठा प्रश्न सामान्यांचा मनात आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 05, 2026 | 02:14 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • LPG सिलेंडरच्या किमतींवर होणार परिणाम?
  • सरकारने LNG सप्लायवरील बंदी हटवली
  • जाणून घ्या नेमकं काय बदलणार?
महागाईच्या काळात देशाला काहीसा दिलासा मिळावा अशी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने LNG पुरवठ्यावरील आणीबाणीची बंदी उठवली आहे. मध्य पूर्वेकडून भारताला होणारा LNG पुरवठा पुन्हा सुरू झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी, होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे गॅसच्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता, ज्यामुळे सरकारला विशेष व्यवस्था करावी लागली होती. आता परिस्थिती सुधारल्याने हे निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्याचा भारतीयांवर काय परिणाम होणार आहे? LPG सिलेंडर स्वस्त होणार का? असे सगळे प्रश्न सामान्यांच्या मनात असतील तर त्याच प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात.

Aamir Khan Net Worth: आलीशान घर, लक्झरी कार अन्… तिसऱ्यांदा बोवल्यावर चढणारा मिस्टर परफेक्शनिस्ट किती श्रीमंत?

नेमके प्रकरण काय?

मध्यपूर्वेतील तणाव वाढल्यामुळे, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून LNG जहाजांच्या वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. यामुळे जगभरातील इतर देशांसोबतच भारताला होणाऱ्या संभाव्य गॅस पुरवठ्याबद्दल चिंता वाढली होती. या तणावाच्या काळात परिस्थिती बरीच हाताबाहेर गेली होती. मार्च महिन्यात, सरकारने अत्यावश्यक ठिकाणी सर्वप्रथम गॅस पोहोचवला जाईल याची खात्री करण्यासाठी आपत्कालीन नियम लागू केले. आता शांतता प्रस्थापित झाली असून जलवाहतूक पूर्ववत झाल्यामुळे, या नियमांची आवश्यकता राहिलेली नाही.

कोणाला फायदा होणार?

LNG वरील बंदी उठवल्याने नैसर्गिक वायूवर अवलंबून असलेल्या क्षेत्रांना सर्वाधिक फायदा होणार आहे. यामध्ये सीएनजी, पीएनजी, खते, रिफायनरी, शहर गॅस वितरण आणि अनेक उद्योगांचा समावेश आहे. ज्या गोष्टी भारता मोठ्या प्रमाणावर आयात करतो. त्यासगळ्याच गोष्टींचा समावेश यामध्ये होत आहे. गॅस पुरवठा आता पूर्वीप्रमाणेच उपलब्ध होईल. पण यामुळे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की ज्यावेळी अंदाधुंद परिस्थिती होती तेव्हा गॅस सिलेंडरच्या किंमती धडाधड वाढवण्यात आल्या होत्या पण आता त्या तशाच स्वरुपात कमी होणार का?

LPG स्वस्त होईल का?

सरकारने अद्याप एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल जाहीर केला नसला तरी, सुधारित गॅस पुरवठ्यामुळे भविष्यात पुरवठा साखळीवरील दबाव कमी होऊ शकतो. याचा परिणाम घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या दरांवर होऊ शकतो. हे लक्षात घ्यावे की, दरांमधील बदल तेल कंपन्या आणि सरकारद्वारे स्वतंत्रपणे ठरवले जातात.

India Trade Policy: भारताची मोठी व्यापारी खेळी! अमेरिका आणि मलेशियाला दिला दणका; देशाला काय होणार फायदा?

Web Title: Govt lifts ban on lng supply impact on lpg cylinder prices see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • Business News
  • Free LPG
  • LPG Crisis
  • lpg cylinder
  • LPG Gas Price
  • LPG Supply
  • Marathi News
  • Strait of Hormuz

संबंधित बातम्या

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली
1

World News : स्वीडनने माफी मागावी ;सामी लोकांवरील अन्यायाची कबुली

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही
2

Mumbai University : विद्यार्थी–कुलगुरू संवादातून प्रश्नांच्या निराकरणाला गती; तक्रारी समजून घेत प्रभावी कार्यवाही

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा
3

Breaking News :आम्हाला तेल विकू दिले नाही तर कोणालाही तेल विकता येणार नाही ;इराणचा इशारा

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा
4

Maharashtra Drought :दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भव्य गरबा-दांडिया रद्द करा; खर्च शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी वळवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.