Raigad News: रोह्यात शेकापची रणनिती ठरली; ग्रामपंचायत निवडणुकांसह स्मार्ट मीटरविरोधी आंदोलनाचा निर्धार
रोहा येथे शेकापच्या वतीने रोहा तालुकास्तरीय प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची सभा आयोजित करण्यात आली. सभेच्या प्रारंभी तालुका चिटणीस शिवराम महाबले यांनी पक्षाची भूमिका, विचारधारा आणि संघटनात्मक धोरण याविषयी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी २ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या शेकापच्या वर्धापन दिनाचे महत्त्व विशद करत विविध कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच राज्यभर त्याच बरोबर आपल्या तालुक्यात घरोघरी विद्युत मंडळाकडून न जुमानता बसविण्यात येत असलेले स्मार्ट मीटर या विरोधात पक्षाच्या भूमिकेची माहिती देत ६ जुलै रोजी रोहा तहसीलदार यांना पुन्हा निवेदन देण्यात येणार असून यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन या बैठकीतून केले. (फोटो सौजन्य – AI Created)
यावेळी शेकापचे प्रमुख नेते शंकरराव म्हसकर, आरडीसीसी बँकेचे चेअरमन गणेश मढवी, जिल्हा चिटणीस सदस्य विठ्ठल मोरे, रोहा तालुका चिटणीस शिवराम महाबळे, मजूर फेडरेशनचे हेमंत ठाकूर, कार्यालयीन चिटणीस संदेश विचारे, पुरोगामी युवक संघटना रोहा अध्यक्ष संतोष दिवकर, उपाध्यक्ष अमोल शिंगरे, ज्येष्ठ कार्यकर्ते खांडेकर, तुकाराम खांडेकर, गणपत डाकी, जांभेकर, धनंजय पोकळे, सरफळे यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर यांनी शेतकरी कामगार पक्षाचा समृद्ध इतिहास, संघर्षमय वाटचाल आणि जनतेशी असलेले घट्ट नाते यावर प्रकाश टाकला. सभेचा समारोप पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार, ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे आवाहन आणि स्मार्ट मीटरविरोधी आंदोलन यशस्वी करण्याच्या संकल्पाने करण्यात आला. रोहा कार्यालयीन चिटणीस संदेश विचारे यांनी आभार मानले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शेकापचे उमेदवार उभे करून पक्षाची ताकद दाखविण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक शाखेने निवडणुकांच्या तयारीला आतापासून सुरुवात करून संघटन अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी दर्शवत सज्ज राहणे आवश्यक आहे. – गणेश मढवी, संचालक, आरडीसीसी बँक
पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण, राज्यातील पायाभूत सुविधांवर ‘कॅग’च्या अहवालाची मोहोर
शेकाप पक्षाच्या विचारांची अधिक प्रभावीपणे मांडणी करण्यासाठी नियमित अभ्यास शिबिरे आयोजित केले पाहिजेत. शेतकरी कामगार पक्ष हा तळागाळातील जनतेचा पक्ष असून त्याची विचारधारा कधीही संपुष्टात येणार नाही, असा विश्वास आहे. – शंकरराव म्हसकर, ज्येष्ठ नेते, शेकाप






