हिंगणघाट : तालुक्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार पीडितेच्या मामेभावाने केला असल्याचे उघड झाले आहे. हिंगणघाट पोलीस ठाण्यांतर्गत गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच घरात राहणाऱ्या मामेभावाने अत्याचार केला. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आले आहे.
[read_also content=”एकतर्फी प्रेमातून युवतीच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने वार करत केली तिची हत्या नंतर, स्वतःच्याच गळ्याला लावला ब्लेड https://www.navarashtra.com/latest-news/vidarbha/gondia/out-of-one-sided-love-he-struck-the-girl-on-the-head-with-an-iron-hammer-and-then-killed-her-nraa-244390.html”]
हिंगणघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावातील पीडित अल्पवयीन मुलीचा मामेभाऊ तिच्याच घरी राहत होता. मामेभावाने कधी मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले हे घरच्यांना कळलेच नाही. मात्र, मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात नेले असता हा नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला. डॉक्टरांच्या उपचारानंतर ही पीडित मुलगी तीन महिन्याची गरोदर असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस येतास डॉक्टरांनी पीडितेच्या आई वडिलांना संपूर्ण माहिती दिली.
[read_also content=”गुंड शोएब सलीम खान याने वचपा काढत कारागृह अधिकारी हेमंत इंगोले यांच्यावर केला प्राणघातक हल्ला https://www.navarashtra.com/nagpur/vidarbha/nagpur/goon-shoaib-salim-khan-assaults-prison-officer-hemant-ingole-nraa-243845.html”]