यंदाच्या हिवाळ्यात शिमला-मनाली सोडा, देशातील या 5 ठिकाणांना द्या भेट
Travel News : जगातील एकमेव तरंगणारे उद्यान आहे भारतात! कुठे आहे ते जाणून घ्या
चितकुल, हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशातील किन्नौर जिल्ह्यात चितकुल नावाचे एक सुंदर गाव आहे. या गावाचे साैंदर्य इतके सुंदर आणि अद्भूत आहे की यापुढे शिमला-मनालीही फेल आहे. या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते भारत-तिबेट सीमेच्या अगदी टोकाला वसलेले आहे. इथे लाकडाची जुनी घरे तुम्हाला पाहयला मिळतील. तसेच पर्वतातून वाहणारी बस्पा नदीकिनारी तुम्हाला शांत आणि चांगला वेळ घालवता येऊ शकतो.
कल्पा, हिमाचल प्रदेश
शिमलापासून 260 किलोमीटर अंतरावर कल्पा वसले आहे. सांगितले जाते की, १९ व्या शतकात लाॅर्ड डलहाैजीच्या यात्रेनंतर लोकांमध्ये या ठिकाणाची प्रसिद्धी वाढली. या ठिकाणाहून भगवान शिवाचे हिवाळी निवासस्थान असलेल्या किन्नर कैलास पर्वतरांगेचे सुंदर दृश्यही दिसते. जर तुम्ही हिवाळ्यात निसर्गाने नटलेल्या ठिकाणाला भेट देण्याचा विचार करत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल.
मुनस्यारी, उत्तराखंड
उत्तराखंडचे काश्मीर म्हणून या ठिकाणाला ओळखले जाते. इथे बर्फाची सुंदर चादर पसरल्याचे दिसते, हिवाळ्यात भेट देण्यासाठी हे ठिकाण एक परफेक्ट पर्याय आहे. पिथोरगड जिल्ह्यात अंदाजे २,२०० ते २,३०० मीटर उंचीवर मुनस्यारी वसले आहे. इथे तुम्हाला हिमालयातील पाच शिखरांचे विहंगम दृष्य पाहायला मिळेल.
तवांग, अरुणाचल प्रदेश
समुद्रसपाटीपासून साधारण 10,000 फूट उंचावर हे ठिकाण वसले आहे. इथे जगातील दुसरा आणि भारतातील पहिला सर्वात मोठा बाैद्ध मठ वसलेला आहे. तथापि, लक्षात घ्या, तवांगमध्ये बर्फाळ वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी तुमच्याकडे इनर लाइन परमिट असणे अनिवार्य आहे.
इंडोनेशिया ते थायलंड… जगभरातील या देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होते रामलीला
मेचुका, अरुणाचल प्रदेश
हिवाळ्यात तुम्ही अरुणाचल प्रदेशातील मेचुका या ठिकाणालाही भेट देऊ शकता. आम्ही तुम्हाला सांगतो की, मेचुकापासून साधारण 29–30 किलोमीटर अंतरावर मॅकमोहन रेषा आहे. इथे तुम्हाला हिरवाई, पांढऱ्या बर्फाच्छादित पर्वतांचे शिखर, वाहणाऱ्या नद्या आणि सुंदर दऱ्या पाहायला मिळतील. २३ ते २५ नोव्हेंबर दरम्यान इथे दरवर्षी ‘अॅडव्हेंचर अॅट मेचुका’ नावाचा तीन दिवसीय क्रिडा उत्सव सुरु होतो. यात साहसी खेळ खेळले जातात.






