Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : पाऊस गायब, जलाशयही अर्धवट! वर्धा जिल्ह्यावर जलसंकटाचे सावट

Wardha News : वर्धा जिल्ह्यावर यंदा वरुणराजाची नाराजी कायम आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत अपेक्षित पावसाच्या तुलनेत तब्बल 36.92 टक्के तूट नोंदवण्यात आली असून जलाशयांची स्थितीही चिंताजनक आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 05, 2026 | 02:40 PM
Wardha Dam

Wardha Dam

Follow Us
Follow Us:
  • चार महिन्यांत 36.92% पावसाची तूट
  • हिंगणघाटमध्ये सर्वाधिक कमी, केवळ 47% पर्जन्यमान
  • जलाशय पूर्ण न भरल्याने आगामी काळात जलसंकटाची चिंता
 

Wardha News : यंदा वर्धा जिल्ह्यावर वरुणराजाची नाराजी काही केल्या कमी होताना दिसत नाही. जूनपासूनच पावसाने अपेक्षित साथ दिली नाही. त्यानंतर अधूनमधून झालेल्या पावसाच्या जोरावर शेतकऱ्यांनी पेरणीची कामे उरकली. मात्र, पिकांना पुढच्या टप्प्यात पावसाची गरज असताना पुन्हा पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

नेहमी जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांत जिल्ह्यात सरासरी 719.03 मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र यंदा या तीन महिन्यांत केवळ 491.02 मिमी पाऊस झाला. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी राहिले.

चार महिन्यांत 36.92 टक्के पावसाची तूट

सप्टेंबर महिन्यात तरी पावसाची तूट भरून निघेल, अशी अपेक्षा होती. मात्र सप्टेंबरनेही निराशाच केली. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत जिल्ह्यात 874.05 मिमी पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात मात्र 558.03 मिमी पाऊस नोंदवला गेला.

Wardha News : वर्ध्यात दुष्काळाचं संकट! पीक नुकसानीचे पंचनामे सुरू, १० ऑक्टोबरला अहवाल

त्यामुळे चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्याच्या पर्जन्यमानात तब्बल 36.92 टक्के तूट राहिली आहे. सप्टेंबरमध्येही पावसाची कमतरता वाढल्याने आगामी काळातील पाणीस्थितीबाबत प्रशासन आणि नागरिकांची चिंता वाढली आहे.

हिंगणघाटची स्थिती सर्वाधिक चिंताजनक

तालुकानिहाय आकडेवारी पाहिली तर हिंगणघाटमध्ये केवळ 47 टक्के पर्जन्यमान नोंदवले गेले आहे. त्यानंतर सेलूमध्ये 63.08 टक्के आणि समुद्रपूरमध्ये 63.03 टक्के पाऊस झाला.

आर्वीमध्ये 69.06 टक्के, देवळीमध्ये 70.05 टक्के, वर्ध्यात 75.01 टक्के, आष्टीमध्ये 76.06 टक्के, तर कारंजामध्ये 82.03 टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली.

जलाशयही फुल्ल नाहीत; पाणी वापराबाबत सावध राहण्याची गरज

पावसाने दडी मारल्याचा फटका केवळ शेतीला बसलेला नाही, तर जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम जलाशयही अपेक्षेप्रमाणे भरलेले नाहीत. त्यामुळे पुढील काळात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीच्या पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.

ऑक्टोबरमध्ये पाऊस चांगला होईल की नाही, याची सध्या कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर आत्तापासूनच जपून करणे गरजेचे आहे. पावसाची तूट अशीच कायम राहिली तर आगामी काळात जलसंकटाची चाहूल अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Wardha News : अवैध खनिज उत्खननावर मोठी कारवाई; ५२ प्रकरणे उघड, १७.९९ कोटींचा दंड, ४९ वाहने जप्त

तालुकानिहाय झालेल्या पर्जन्यमानाची टक्केवारी

तालुका  पर्जन्यमान
आर्वी ६९.०६%
कारंजा ८२.०३%
आष्टी ७६.०६%
वर्धा ७५.०१%
सैलू ६३.०८%
देवळी ७०.०५%
हिंगणघाट ४७.००%
समुद्रपूर ६३.०३%

Web Title: Wardha news rainfall deficit 36 92 percent water crisis warning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • drought news
  • Maharashtra Drought 2026
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : वर्ध्यावर जलसंकटाचं सावट! ५१९ ग्रामपंचायतींकडून अहवाल मागवला; प्रशासनाची तयारी सुरू
1

Wardha News : वर्ध्यावर जलसंकटाचं सावट! ५१९ ग्रामपंचायतींकडून अहवाल मागवला; प्रशासनाची तयारी सुरू

Amravati News: दुष्काळात शाळांचा फीसाठी तगादा! जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी
2

Amravati News: दुष्काळात शाळांचा फीसाठी तगादा! जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी

Manoj Jarange : मराठ्यांचा पुन्हा एल्गार, नारायणगडावर लाखोंच्या संख्येनं जमण्याचं जरांगेंचं आवाहन
3

Manoj Jarange : मराठ्यांचा पुन्हा एल्गार, नारायणगडावर लाखोंच्या संख्येनं जमण्याचं जरांगेंचं आवाहन

Wardha News : वर्ध्यात दुष्काळाचं संकट! पीक नुकसानीचे पंचनामे सुरू, १० ऑक्टोबरला अहवाल
4

Wardha News : वर्ध्यात दुष्काळाचं संकट! पीक नुकसानीचे पंचनामे सुरू, १० ऑक्टोबरला अहवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.