Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुन्हा पाऊस ! सातारा, सांगलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडू शकतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 29, 2026 | 08:44 AM
सातारा, सांगलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

सातारा, सांगलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्रातील मान्सूनची सक्रियता काहीशी कमी झाली असली तरी पावसाचा जोर पूर्णपणे ओसरलेला नाही. हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील १६ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. राज्याच्या इतर भागांत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडू शकतात. मात्र, संपूर्ण जिल्ह्यात पाऊस पडेलच असे नाही. स्थानिक हवामान परिस्थितीनुसार, काही भागांतच पावसाची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस झाला. चंद्रपूरच्या सिंदेवाही आणि जळगावच्या भडगाव येथे प्रत्येकी ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे राज्यात पावसाचे वितरण अद्याप असमान असल्याचे दिसून येते. अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली असताना काही ठिकाणी अल्पावधीत जोरदार सरी कोसळत आहेत.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनची अक्षीय रेषा सध्या महाराष्ट्रापासून उत्तरेकडे सरकली आहे. दक्षिण उत्तर प्रदेश आणि लगतच्या मध्य प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याच्या प्रभावामुळे परिसरात चक्रीवादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण-मध्य महाराष्ट्रातही उंच पातळीवर चक्रीवादळीय अभिसरण सक्रिय आहे. या हवामान प्रणालींमुळे राज्यात पावसाची गतिविधी सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या सर्वदूर मुसळधार पावसाऐवजी काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी पडण्याचा अंदाज आहे.

अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. पश्चिम बंगाल, सिक्कीम, उत्तराखंड आणि झारखंडमध्येही मेघगर्जनेसह पाऊस राहील असा अंदाज आहे. दक्षिण आणि पश्चिम भारतातील केरळ, किनारपट्टीवरील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका आणि मैदानी भागात पाणी साचण्याच्या शक्यतेमुळे प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…

Web Title: Warning of heavy rain accompanied by thunderstorms in several districts of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 08:44 AM

Topics:  

  • Climate Change
  • Monsoon News
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; नदी-नाले कोरडे, खरीप हंगाम धोक्यात
1

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; नदी-नाले कोरडे, खरीप हंगाम धोक्यात

देशातील अनेक ठिकाणी पुन्हा मुसळधार पाऊस होणार; आसाम, मेघालयसह ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा
2

देशातील अनेक ठिकाणी पुन्हा मुसळधार पाऊस होणार; आसाम, मेघालयसह ‘या’ राज्यांना सतर्कतेचा इशारा

राजधानी दिल्लीसह उत्तराखंड, केरळमध्येही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…
3

राजधानी दिल्लीसह उत्तराखंड, केरळमध्येही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका
4

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.