जमीन लीजवर देण्याच्या बहाण्याने व्यावसायिकाला 85 लाखांचा गंडा; कागदपत्रे दाखवली अन् नंतर...(File Photo : Fraud)
रिसोड : रिसोड येथील स्टेट बँकेतून 60 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाली. या प्रकरणाची तक्रार तालुक्यातील मोप येथील गोपाल शेषराव नरवाडे यांनी रिसोड पोलिस ठाण्यात केली आहे. रिसोड येथील भारतीय स्टेट बँकेचे खातेदार गोपाल शेषराव नरवाडे (रा. मोप ता. रिसोड) हे आहेत.
हेदेखील वाचा : चोराच्या उलट्या बोंबा! चोरी करायला गेला अन् पहिल्या मजल्यावरुन पडला
गोपाल नरवाडे यांचे हे खाते रिसोड येथील स्टेट बँकेमध्ये असून, अनेक वर्ष सदर खात्यातून आर्थिक व्यवहार केलेला असून, विविध शासकीय योजनेचा निधी सुद्धा सदर खात्यामध्ये जमा झालेला आहे. त्याबद्दल बँकेचे सर्व स्टेटमेंट उपलब्ध आहेत. सदर खात्यातील रक्कम काढण्यासाठी गोपाल नरवाडे हे गेले असता खात्यामध्ये रक्कम आढळून आली नाही.
यासंदर्भात स्टेट बँक शाखा रिसोड येथे चौकशी करण्यासाठी गेले असता बँकेच्या कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर चौकशी केली असता नावाचे साम्य असलेला बिबखेडा येथील रहिवासी गोपाल शेषराव नरवाडे यांनी बँकेच्या व्यवस्थापकीय कर्मचाऱ्याशी संगनमत करून एकसारख्या नावाचा फायदा घेऊन सदर बँक खाते ऑनलाईन व्यवहार करण्याकरिता सदर व्यक्तीला बँक व्यवस्थापकाने बेकायदा परवानगी देऊन 60 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
या संदर्भात योग्य ती चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सदर अर्जात केली आहे. सदर बँकेच्या शाखाधिकारी यांच्याशी संपर्क केल्यानंतर आज सुटी असल्याने या तक्रारीबाबत मी काहीही सांगू शकत नाही, यासंदर्भात कार्यालयीन वेळेत तक्रार पाहिल्यानंतर यावर प्रतिक्रिया देता येईल, अशी प्रतिक्रिया दिली.
खातेदारांना दिली जाते वाईट वागणूक
भारतीय स्टेट बँकेमध्ये गेल्यानंतर सर्व ग्राहकांना अतिशय खालच्या दर्जाची वागणूक दिली जात आहे. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून माझी फसवणूक झाली. त्यासंदर्भात योग्य ती चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित गोपाल नरवाडे यांनी केली आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Cabinet Portfolio: हा फॉर्म्युला ठरवणार मंत्र्यांचं भविष्य;फडणवीस स्पष्टचं बोलले