फोटो सौजन्य- pinterest
परिवर्तिनी एकादशी बुधवार, 3 सप्टेंबर रोजी आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला साजरी केली जाते. यावेळी भगवान विष्णूंची पुजा केली जाते. या पूजेला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी तुमच्या राशीनुसार रंगांचे कपडे परिधान केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि मन शांत राहते. तसेच भक्तांवर भगवान विष्णूचा आशीर्वाद देखील राहतो. परिवर्तिनी एकादशीला कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे, जाणून घ्या
परिवर्तिनी एकादशीच्य दिवशी मेष राशीच्या लोकांनी लाल किंवा नारिंगी रंगांचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. या रंगांमुळे तुमच्यामधील उत्साह वाढतो. लाल रंग मंगळाचे प्रतीक आहे आणि तुमच्यातील आत्मविश्वास वाढतो. या दिवशी लाल कुर्ता, साडी किंवा नारंगी दुपट्टा घाला आणि भगवान विष्णूची पूजा करा. यामुळे तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात.
वृषभ राशीच्या लोकांनी एकादशीला पांढरा किंवा हलका हिरव्या रंगांचे कपडे परिधान करावे. पांढरा रंग शांती आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते त्यामुळे मन शांत राहते. हिरवा रंग शुक्राचा प्रभाव वाढवतो. त्यामुळे नात्यामधील गोडवा वाढतो.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हिरव्या रंगांचे कपडे परिधान करावे. या रंगांचे कपडे परिधान करणे फायदेशीर ठरते. हिरवा रंग तुमचा बुद्धिमत्ता ग्रह बुध ग्रह मजबूत करतो त्यामुळे तुमचे विचार स्पष्ट होतील आणि निर्णय घेणे सोपे होईल. या रंगांमुळे तुमचे मन ताजेतवाने ठरेल.
कर्क राशीच्या लोकांनी परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी पांढऱ्या रंगांचे कपडे परिधान करणे शुभ राहील. हा रंग चंद्राचे प्रतीक मानला जातो. तसेच कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहते आणि मानसिक ताण देखील कमी होतो.
सिंह राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगांचे कपडे परिधान करणे शुभ राहील. पिवळा रंग सूर्याचे प्रतीक आहे यामुळे तुमच्यामधील आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमता वाढवेल. तसेच तुमच्या कारकिर्दीतही वाढ होईल.
कन्या राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी हिरवा किंवा तपकिरी रंगांचे कपडे परिधान करावा. हिरवा रंग तुमचा बुध ग्रह मजबूत करेल त्यामुळे तुमची बौद्धिक क्षमता वाढेल. तुम्हाला कामामध्ये अपेक्षित यश मिळेल त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.
तूळ राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी पांढरे किंवा गुलाबी रंगांचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते. हा रंग शुक्र ग्रहाला बळकटी देतो. यामुळे तुमच्या जीवनामध्ये शांती आणि समृद्धी येईल.
वृश्चिक राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी लाल किंवा गडद गुलाबी रंग परिधान करणे शुभ मानले जाते. लाल रंग मंगळाचे प्रतीक मानले जाते. यामुळे तुमच्यामधील ऊर्जा आणि धैर्य वाढेल. तसेच तुमची आध्यात्मिक शक्ती वाढेल.
धनु राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी पिवळे किंवा केशरी रंगांचे कपडे परिधान करणे फायदेशीर ठरेल. पिवळा रंग गुरु ग्रहाला बळकटी देतो ज्यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभते. या रंगामुळे तुमच्यामधील सकारात्मकता वाढेल.
मकर राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी निळा किंवा काळ्या रंगांचे कपडे परिधान करावे. निळा रंग शनि ग्रहाचे प्रतीक मानला जातो. ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये शिस्त आणि स्थिरता आणेल.
कुंभ राशीच्या लोकांनी एकादशीला निळे किंवा जांभळ्या रंगांचे कपडे परिधान करावे. निळा रंग शनिचा प्रभाव वाढवतो त्यामुळे तुमचे मन शांत आणि एकाग्र राहते. तर जांभळा रंग आध्यात्मिकतेत वाढ होते.
मीन राशीच्या लोकांनी एकादशीच्या दिवशी पिवळा किंवा भगवा रंगांचे कपडे परिधान करावे. गुरु ग्रहाला बळकटी देण्यासाठी हे रंग शुभ मानले जातात. यामुळे तुमची अध्यात्म आणि बुद्धिमत्ता वाढेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)