श्वसनाचा विकार असल्यास काय करावे (फोटो सौजन्य - iStock)
गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि एकत्र येऊन साजरा सण आहे, जो सर्व वयोगटातील व्यक्ती मोठ्या उत्साहाने साजरा करतात. शिवाय आपल्या कुटुंबियांना, मित्र परिवाराला आणि समाजाला एकत्र आणतो. सार्वजनिक गणेशोत्सवात दर्शनासाठी झालेली आणि त्या गर्दीत खोकणे, शिंकणे आणि अगदी बोलणे याद्वारे देखील विषाणू आणि बॅक्टेरिया चा प्रसार होतो. या सणाच्या काळात मुलं, वयोवृद्ध महिला, गर्भवती महिला आणि दमा किंवा कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्ती असुरक्षित असतात यामुळे सावधगिरी बाळगणे अधिक गरजेचे आहे.
एम्स हॉस्पिटल डोंबिवलीचे जनरल फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. कुशल बांगर सांगतात की, सणासुदीचा काळ हा संसर्ग वाढीस कारणीभूत ठरु शकतो. उत्सवादरम्यान मोठ्या संख्येने लोक एकत्र येत असल्याने सर्दी, फ्लू आणि घशाच्या संसर्गासारख्या श्वसन संसर्गांमध्ये चिंताजनक वाढ होऊ शकते. प्रत्येकाने सतर्क राहावे आणि सतत खोकला, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. निरोगी राहण्यासाठी आणि श्वसन संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर राखणे आणि हायड्रेटेड राहणे गरजेचे आहे. आपले आरोग्य जपून हा सण भक्तीने साजरा करण्याचा प्रयत्न करा.
पावसाळ्यातील श्वसन संसर्ग टाळण्यासाठी अशी घ्या काळजी
डॉ. अहमद खान, इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट, मधुमेह विकार तज्ज्ञ आणि संसर्गजन्य रोग तज्ज्ञ, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, खारघर, नवी मुंबई यांनी सांगितले की, श्वसन संसर्गाची सामान्य लक्षणे म्हणजे खोकला आणि घसा खवखवणे, वाहणारे किंवा चोंदलेले नाक, ताप आणि अंगदुखी, थकवा, अशक्तपणा, छातीत घरघर किंवा श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे आढळून येतात.अशी लक्षणे आढळतात विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या कळवा आणि वेळीच व्यवस्थापन करा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.






