महिलांमधील PCOS ची समस्या कमी करण्यासाठी प्रभावी ठरतील 'या' बिया
घरातील जबाबदाऱ्या, काम, नातेसंबंध इत्यादी अनेक गोष्टींना वेळ देण्याच्या नादात महिला स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. सतत घरातील काम, चुकीच्या वेळी जेवण, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. मासिक पाळीच्या चक्रात बदल झाल्यानंतर संपूर्ण शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. अनियमित मासिक पाळी, चेहऱ्यावरील केस, हार्मोन्सचे असंतुलन, अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे इत्यादी समस्यांचं सामना महिलांना करावा लागतो. हल्ली अनेकांमध्ये पीसीओएसची समस्या वाढू लागली आहे. पीसीओएसला वैद्यकीय भाषेत पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असे सुद्धा म्हंटले जाते.(फोटो सौजन्य – istock)
पोटावर वाढलेले चरबीचे टायर्स कमी करण्यासाठी ग्रीन टी मध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, कायमच दिसाल स्लिम
पीसीओएसची समस्या उद्भवल्यानंतर मासिक पाळी अनियमित होते. याशिवाय शरीरात अनेक मोठे बदल दिसून येतात. अशावेळी कायमच दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. पीसीओएस झाल्यानंतर कायमच गोळ्या औषधांचे सेवन करावे लागते, असे अनेकांना वाटते. पण असे नसून आहारात बदल आणि नियंत्रण मिळवून तुम्ही पीसीओएसची समस्या कायमची दूर करू शकता. पीसीओएसची समस्या दूर करण्यासाठी अळशीच्या बियांचे सेवन करावे. या बिया आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. शरीरातील सूज, हार्मोन्सचे असंतुलन आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी अळशीच्या बिया अतिशय गुणकारी ठरतात.
वय वाढल्यानंतर महिलांच्या शरीरात सतत काहींना काही बदल होतात. या बदलांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे. अळशीच्या बियांचे सेवन केल्यामुळे हार्मोन्स संतुलित राहतात. पीसीओएस झाल्यानंतर शरीरातील मेल हार्मोन म्हणजेच अँड्रोजनची पातळी वाढू लागते, ज्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर केस येणे, मुरूम किंवा मोठे मोठे पिंपल्स येऊ लागतात. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. स्त्रियांच्या शरीरात स्त्री-पुरुष हार्मोन्स संतुलित राहिल्यास आरोग्याला कोणतीही हानी पोहचत नाही.
पीसीओएस झाल्यानंतर शरीराच्या कोणत्याही अवयवाला अचानक सूज येते. अशावेळी अळशीच्या बियांचे सेवन करावे. या बियांमध्ये ‘सेकोइजोलॅरिकायरेसिनॉल डायग्लुकोसाइड’ नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे शरीराला आलेली सूज कमी होते आणि आरोग्य सुधारते.यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीरातील हार्मोन्स कायमच संतुलित ठेवतात.
वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. पण अळशीच्या बियांचे पाणी नियमित प्यायल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होते. हार्मोन्स असंतुलित झाल्यामुळे शरीरावर अनावश्यक चरबी वाढू लागते, ज्यामुळे वजन वाढते. अंगावर वाढलेला चरबीचा थर कमी करण्यासाठी उपाशी पोटी अळशीच्या बियांचे पाणी प्यावे.
PCOS म्हणजे काय?
PCOS असलेल्या महिलांमध्ये अंडाशय जास्त प्रमाणात अँड्रोजन तयार करतात. हे एक गंभीर हार्मोनल असंतुलन आहे, ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होते. PCOS हे कधीकधी PCOD च्या गंभीर प्रकारात मोडते, जिथे अंडाशयात सिस्ट्स (गाठी) तयार होतात आणि अंडी सोडली जात नाहीत.
पीसीओएसची लक्षणे:
पाळी वेळेवर न येणे किंवा खूप दिवस येणे.चेहऱ्यावर, छातीवर, पाठीवर आणि पोटावर केस वाढणे.त्वचेवर मुरुमे येणे. वजन नियंत्रित करणे कठीण होते.चिंता, नैराश्य आणि शरीराच्या प्रतिमेबद्दल असंतोष वाढू शकतो.