
Washim Child Health Nutrition Campaign
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल कावरखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रेमकुमार ठोंबरे यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राचविण्यात येत आहे. आरोग्य, शिक्षण तसेच महिला व बालविकास विभागाने समन्वयाने काम करून मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी. शाळाबाह्य बालकांपर्यंतही पोहोचून त्यांना जंतनाशक गोळी देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देशही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
बालकांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी जंतनाशक मोहीम महत्त्वपूर्ण आहे. जतदोषामुळे अशक्तपणा, कुपोषण तसेच अभ्यासातील एकाग्रतेचा अभाव निर्माण होऊ शकतो. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी निर्धारित वेळापत्रकानुसार यात्र बालकांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनानुसार मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुंभेजकर यानी केले.
जिल्ह्यातील तालुकानिहाय लाभाथ्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. वाशिम तालुक्यात ७८ हजार १३२. कारंजा तालुक्यात ५० हजार ५४५, रिसोड तालुक्यात ४५ हजार ५८८, मानोरा तालुक्यात ३९ हजार १, मालेगाव तालुक्यात ३७ हजार ३३९ आणि मंगरूळपीर तालुक्यात ३५ हजार २४२ बालकांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण २ लाख ८५ हजार ८४७ बालकांना गोळी देण्याचे उद्दिष्ट आहे. मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील १ हजार १९६ अंगणवाडी केंद्रे, १ हजार २२४ शाळा आणि २८६ महाविद्यालयांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. यासाठी १ हजार ७५ आशा स्वयंसेविका आणि १६६ आरोग्य सेविका कार्यरत राहणार आहेत.
१ ते २ वर्षे वयोगटातील बालकाना २०० मि. ग्रॅ. म्हणजे अर्धी गोळी, तर २ ते १९ वर्षे वयोगटातील बालकांना आणि किशोरवयीन मुला-मुलींना ४०० मि.ग्रॅ. म्हणजे एक पूर्ण गोळी देण्याचे नियोजन आहे. शाळांमधील विद्याथ्यांना शिक्षक व आरोग्य कर्मचा-यांच्या माध्यमातून, तर अंगणवाडीतील आणि शाळाबाहय बालकांना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून गोळी देण्यात येणार आहे. मोहिमेच्या दिवशी आजारी असलेल्या किंवा गैरहजर राहिलेल्या पात्र बालकांना ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिनी गोळी देण्यात येईल, त्यामुळे नियमित मोहिमेत सहभागी होऊ न शकलेल्या बालकांनाही जंतनाशक उपचार मिळू शकणार आहेत.
मोहिमेसाठी जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांना एकूण ३ लाख २६ हजार अल्बेंडाझोल गोळ्यांचे वितरण करण्यात आले. गुरुवारी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा पूर्ण झाली असून, शनिवारी तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर शिक्षक, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र बालकाला जंतनाशक गोळी मिळावी, यासाठी सर्व संबंधित विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. पालकांनीही आपल्या पाल्यांना मोहिमेत सहभागी करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले.