Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News: जलसाठ्याने गाठला तळ, वाशिममध्ये पाणीटंचाईचा अलर्ट; सरकारी जागेवरील बोरवेल ताब्यात घेण्याची मागणी

Washim Dam Water Shortage Crisis: वाशिम जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमधील जलसाठा घटल्याने आगामी काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ७५ प्रकल्पांमध्ये सरासरी केवळ ३२.४८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 24, 2026 | 09:29 PM
Washim Dam Water Shortage

Washim Dam Water Shortage

Follow Us
Follow Us:
  • वाशिमवर जलसंकटाचं सावट
  • ७५ प्रकल्पांत फक्त ३२.४८% जलसाठा
  • बोरवेल ताब्यात घेण्याची मागणी

वाशिम: जिल्ह्यात आगामीकाळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. लघु व मध्यम प्रकल्पांमधील जलसाठ्याने आतापासूनच तळ गाठल्याने जलसंकट अधिक गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील सरकारी जागेत काढण्यात आलेले अवैध बोरवेल प्रशासनाने वेळीच अधिग्रहित (ताब्यात) करून नागरिकांसाठी आणि टँकर पाणीपुरवठा करण्यासाठी उपयोगात आणावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे. विशेषतः हायवे लगत असलेले हे बोरवेल पाणीटंचाईच्या काळात तारणहार ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Washim: शेतात लपविलेला बनावट दारूचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, टो येथील तिघांना केले गजाआड

शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार, वाशिम जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती चिंताजनक बनली आहे. वाशिम तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात सध्या ३७.५९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. मालेगाव येथील सोनल प्रकल्पात केवळ २२.१६ टक्के पाणीसाठा उरला आहे. जिल्हयातील एकूण ७५ लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून सध्या सरासरी केवळ ३२,४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. यापैकी तब्बल ९ प्रकल्पांमधील पाणीसाठा चक्क टक्क्यांवर (तळाला) पोहोचला आहे.

गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे भूगर्भाची पातळी सुधारली होती. मात्र वाढत्या उन्हाळा आणि तीव बाष्पीभवन यामुळे जलसाठ्यात वेगाने घट होत आहे. परिणामी, अनेक भागांत आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली असून काही ठिकाणी १० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे, तर ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे.

प्रशासनासमोर मोठे आव्हान

जिल्ह्यातील ही बिकट पाणीस्थिती आगामी काळात प्रशासनासाठी एक मोठे आव्हान ठरणार आहे. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून बैठकांचे सत्र सुरू असले, तरी ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारी जागेतील अवैध बोरवेल प्रशासनाने ताब्यात घेऊन टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी वापरणे गरजेचे बनले आहे. तसेच, सार्वजनिक जलस्रोतांमधून होणारा अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली.

Washim: महिला बचत गटाच्या वसुली त्वरित थांबवा, दुष्काळी परिस्थितीत कर्ज हप्त्यासाठी दबाव टाकू नये; तहसीलदारांना निवेदन

Web Title: Washim water shortage crisis dam water storage borewell news pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 09:29 PM

Topics:  

  • Dam Water Level
  • Washim
  • Washim news
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Buldhana News: तूर-हळद वाचवण्यासाठी धरणांचं पाणी द्या; रविकांत तुपकरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न
1

Buldhana News: तूर-हळद वाचवण्यासाठी धरणांचं पाणी द्या; रविकांत तुपकरांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडले शेतकऱ्यांचे प्रश्न

Koyna River: कोयना नदीची पाणीपातळी घटली; पाटण तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट, शेतकऱ्यांची चिंता वाढली
2

Koyna River: कोयना नदीची पाणीपातळी घटली; पाटण तालुक्यावर पाणीटंचाईचे सावट, शेतकऱ्यांची चिंता वाढली

Washim: शेतात लपविलेला बनावट दारूचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, टो येथील तिघांना केले गजाआड
3

Washim: शेतात लपविलेला बनावट दारूचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, टो येथील तिघांना केले गजाआड

चारा-पाणी नियोजनावर लक्ष द्यावे, देऊळगाव राजात पाणीटंचाईचे सावट; आमदार मनोज कायंदेंनी दिले निर्देश
4

चारा-पाणी नियोजनावर लक्ष द्यावे, देऊळगाव राजात पाणीटंचाईचे सावट; आमदार मनोज कायंदेंनी दिले निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.