Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाशिममध्ये संतापजनक घटना! सकाळी किरकोळ वाद, क्षणात संसाराचा अंत! पत्नीची हत्या करून पती फरार

वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्पना योगेश ढवळे (वय अंदाजे 35) यांच्यावर पतीने धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप आहे. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून, आरोपी पती योगेश ढवळे याला पोलिसांनी अटक केली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 18, 2026 | 05:25 PM
वाशिममध्ये संतापजनक घटना! सकाळी किरकोळ वाद, क्षणात संसाराचा अंत! पत्नीची हत्या करून पती फरार

वाशिममध्ये संतापजनक घटना! सकाळी किरकोळ वाद, क्षणात संसाराचा अंत! पत्नीची हत्या करून पती फरार

Follow Us
Follow Us:
  • रिसोडच्या छत्रपती संभाजीनगर परिसरात पत्नीवर धारदार शस्त्राने वार.
  • कल्पना ढवळे यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू.
  • घटनेनंतर फरार झालेल्या पतीला पोलिसांनी अटक केली.

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगोली मार्गावरील छत्रपती संभाजीनगर परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कल्पना योगेश ढवळे (वय अंदाजे 35 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी आरोपी पती योगेश ढवळे याला पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळी सातच्या सुमारास वाद; पतीचा हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सातच्या सुमारास कल्पना आणि योगेश यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर शाब्दिक भांडणात झाले. त्यानंतर रागाच्या भरात योगेशने कल्पना यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात कल्पना गंभीर जखमी झाल्या.

हेही वाचा: सोशल मीडियावर ओळख, एकतर्फी प्रेमाचा संशय; कॉलेजमधून घरी परतताना तरुणीची हत्या

उपचारादरम्यान कल्पना यांचा मृत्यू

हल्ल्यानंतर जखमी कल्पना यांना तातडीने रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या प्रकाराने हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर आरोपी योगेश ढवळे फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्याला ताब्यात घेतले आणि अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास रिसोड पोलीस करत आहेत.

पंधरा दिवसांपूर्वीच घेतले होते भाड्याने घर

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश ढवळे हा मूळचा वाशिम येथील काळेफैल परिसरातील रहिवासी आहे. तो मागील काही वर्षांपासून परभणी येथे स्थायिक झाला होता आणि एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. सुमारे पंधरा दिवसांपूर्वीच तो रिसोड शहरातील छत्रपती संभाजीनगर परिसरात भाड्याने राहायला आला होता. त्यानंतर काही दिवसांतच ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी रिसोड पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, घटनेमागील नेमकी कारणे तपासातून स्पष्ट होणार आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पत्नीची हत्या कुठे झाली?

    Ans: वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील हिंगोली मार्गावरील छत्रपती संभाजीनगर परिसरात ही घटना घडली.

  • Que: मृत महिलेचे नाव काय आहे?

    Ans: कल्पना योगेश ढवळे (वय अंदाजे 35 वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे.

  • Que: आरोपी पतीला अटक झाली आहे का?

    Ans: दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर फरार झालेल्या योगेश ढवळे याला पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Washim risod wife murder case husband arrested sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • maharashtra crime cases
  • Murder News
  • Washim Crime News
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim: चारा लागवड मोहीम प्रभावीपणे राबवा, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश; व्यवस्थापनाचा आढावा
1

Washim: चारा लागवड मोहीम प्रभावीपणे राबवा, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश; व्यवस्थापनाचा आढावा

Crime News: मुलगी गरोदर असल्याचं कळताच बापाने उचललं धक्कादायक पाऊल; अखेर कोर्टाचा मोठा निर्णय!
2

Crime News: मुलगी गरोदर असल्याचं कळताच बापाने उचललं धक्कादायक पाऊल; अखेर कोर्टाचा मोठा निर्णय!

Washim: महावितरणने घेतली दखल, दापुरीत जळालेल्या विद्युत डीपी बसविण्याचे काम सुरू; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार
3

Washim: महावितरणने घेतली दखल, दापुरीत जळालेल्या विद्युत डीपी बसविण्याचे काम सुरू; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

Washim: जबरी चोरी करणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ६ लाखांवर मुद्देमाल हस्तगत
4

Washim: जबरी चोरी करणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ६ लाखांवर मुद्देमाल हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.