Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“गडकरींना आम्ही पंतप्रधान करू, फक्त…”; ‘या’ गटाकडून मोठी ‘ऑफर’

  • By Aparna
Updated On: Aug 20, 2023 | 04:10 PM
“गडकरींना आम्ही पंतप्रधान करू, फक्त…”; ‘या’ गटाकडून मोठी ‘ऑफर’
Follow Us
Follow Us:

कॅगच्या अहवालात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागावर ठपका ठेवण्यात आला. या नंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी हा दिल्लीतील राजकारण्यांनी नितीन गडकरींना संपवण्याचा केलेला कट आहे, असा आरोप केला. कॅगच्या अहवालानंतर विरोधकांनी भ्रष्टाचाराचे आरोप करत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.अशातच आता महाविकास आघाडीच्या एका गटाने गडकरींना मोठी ‘ऑफर’ दिली.

काय आहे ऑफर
विनायक राऊत म्हणाले, “महाराष्ट्राचं एक नेतृत्व लोकप्रिय होत आहे. उद्या ते पंतप्रधानपदाचे दावेदार होतील म्हणून नतद्रष्ट दिल्लीच्या राजकारण्यांनी नितीन गडकरींना संपवण्याचा कट केला आहे. हा कट उधळून लावण्याचं काम महाराष्ट्र करेन. आमची नितीन गडकरींना विनंती आहे की, त्यांनी मराठी माणसाचं पाणी त्यांना दाखवावं.”

“आम्ही गडकरींना पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”
“गडकरी त्यांना कशासाठी घाबरत आहेत. त्यांनी फक्त आवाज द्यावा. नितीन गडकरींनी ‘इंडिया’ आघाडीत यावं. आम्ही गडकरींना पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा शब्द उद्धव ठाकरेही देतील,” असंही विनायक राऊतांनी नमूद केलं.

दरम्यान, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कॅगच्या अहवालातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा काटा काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला होता. विजय वडेट्टीवार म्हणाले होते, “कॅगचा रिपोर्ट दोन गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे. एक म्हणजे भाजपाच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी कॅगच्या रिपोर्टचा वापर होत आहे. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार होत असताना कॅगने केवळ गडकरींवर ताशेरे ओढले. यातून हे स्पष्ट होत आहे.”

“नितीन गडकरींविषयी सगळे सांगतात की, स्वच्छ प्रतिमा वगैरे. त्यांची प्रतिमा विकासाची आणि स्वच्छ अशी झाली आहे. त्यामुळे त्यांना बाजूला करून त्यांचं राजकारण संपवायचं हेही एक कारण असू शकतं,” असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता. “कॅगमध्ये भ्रष्टाचार समोर आला आहे. रस्त्यांच्या त्या समितीचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे या कॅग अहवालावर त्यांची भूमिका काय हा प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्रात सगळीकडे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. हा अहवाल समोर आल्यावर आता केंद्र सरकार काय कारवाई करतं याकडे आमचं लक्ष आहे,” असंही वडेट्टीवारांनी नमूद केलं होतं.

Web Title: We will make gadkari the prime minister only a big offer from this group nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2023 | 04:10 PM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • Nitin Gadkari
  • Uddhav Thackeray Group
  • Vinayak Raut

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
2

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
3

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
4

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.