मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) आणि विक्रम लँडर (Vikram Lander) आज, शुक्रवारी इस्रोकडून (ISRO) अॅक्टिव्ह करण्यात येणार आहे. कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे. तसेच राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
लोकसभेनंतर राज्यसभेतही महिला आरक्षण विधेयक 215 मतांनी मंजूर, महिलांना 33 टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा
चांद्रयान-3 मोहिमेसाठी (Chandrayaan-3) आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आता, 16 दिवसांच्या स्लीप मोडनंतर प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) आणि विक्रम लँडर (Vikram Lander) आज, शुक्रवारी इस्रोकडून (ISRO) अॅक्टिव्ह करण्यात येणार आहे. चंद्रावर सूर्यप्रकाश येणार असल्याने लँडर आणि रोव्हरवरील सोलर पॅनेल चार्ज होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा शनिवारी (23 सप्टेंबर) दुपारी 03:30 वाजता लालबागच्या राजाच्या दर्शनाला मुंबईत येणार
कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे.
राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
जुडेगा भारत जितेगा इंडिया महाविकास आघाडीकरून आज जाहिर सभेचे आयोजन
शाहरुख खान लालबाग राजाच्या दर्शनाला, शाहरुख खानसोबत त्याचा लहान मुलगा अब्राहम देखील आहे.
धनगर समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेत राज्य सरकारने तातडीने सह्याद्री अतिथीगृहावर घेतलेली बैठक निष्फळ ठरली आहे.
भारत सरकारचा मोठा निर्णय; कॅनडातून भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी व्हिसा स्थगित
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी नगरच्या चौंडी येथे मागच्या १७ दिवसांपासून उपोषण सुरु आहे.