मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे. तसेच सत्तासंघर्षावर आज दुपारी ३ वाजता विधानभवनात होणार सुनावणी पार पडणार आहे. दोन्ही गटाचे वकील हे विधानसभा अध्यक्षांकडे मांडणार बाजू आहेत. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे-शिवसेना आमदारांना नोटीस पाठवली आहे. त्यानुसार सोमवारी 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याच्या कार्यालयाकडून सुचना करण्यात आल्या आहेत. सोमवारी दुपारी ३ वाजता विधानभवनात होणार सुनावणी पार पडणार आहे. दोन्ही गटाचे वकील हे विधानसभा अध्यक्षांकडे मांडणार बाजू आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील गणपती मंडळांना ते भेटी देणार आहेत.
मनसे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. पुण्यातील गणपती मंडळांना भेटी देणार.
कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे.
राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद, दुपारी ३ः ३० वाजता, स्थळ – राष्ट्रवादी पक्ष कार्यालय , बॅलार्ड इस्टेट, मुंबई,
कोकणवासीयांच्या परतीच्या प्रवासातही विघ्न; रेल्वेच्या ढिसाळ नियोजनामुळे स्थानकांवर गर्दी, कोकणवासीय संतप्त
चौंडीमध्ये धनगर समाजाचे आमरण उपोषण व आंदोलन सुरु आहे.
११ सप्टेंबरपासून टोंगे हे अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण नकोच ही भूमिका मांडत प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी चंद्रपुरात बारा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करणारे राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांची प्रकृती दोन दिवसांपासून खालावली आहे
आज सात दिवस गणपतींचे विसर्जन होणार आहे
अभिनेता शाहरुख खान, जॅकी श्रॉफ आणि सलमान खान यांनी घेतलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानातील बाप्पाचं दर्शन.