मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे. तसेच राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज रोजगार मेळाव्यात 51,000 नियुक्ती पत्रांचे वाटप करणार आहेत.
राफेल लढाऊ विमान खरेदीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वादग्रस्त टिप्पणी केल्याप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज मुंबई आणि पुण्यात येणार आहेत. ते मुंबईत लालबागचा राजाचं दर्शन घेणार आहेत. तर पुण्यात दगडूशेठ हलवाईच्या गणपतीचं दर्शन घेणार आहे. यावेळी ते भाजप नेत्यांच्या घरीही गणपती दर्शनासाठी जाणार आहेत.
कालची सुनावणी संपली दोन्ही गटाच्या वकिलांकडून विधानसभा अध्यक्षांनी म्हणणे ऐकल्यानंतर आपला निर्णय राखीव ठेवला आहे. विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या वकिलांकडून म्हणणे ऐकून घेतले.आमदार अपात्रतेची पुढील सुनावणी 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे
मुख्यमंत्री महोदयांचे मंगळवार दि.२६ सप्टेंबर, २०२३ रोजीचे कार्यक्रम
सकाळी ११.३० वा. स्वच्छता पंधरवाडा – स्वच्छता ही सेवा २०२३ अंतर्गत एक तारीख, एक घंटा, स्वच्छता ही सेवा या उपक्रमाच्या आयोजनाबाबत बैठक ( व्हीसीद्वारे)
● स्थळ-: वर्षा निवासस्थान,मुंबई
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 1 ते 10 ऑक्टोबर परदेश दौरा रद्द
कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे.
राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
पुण्यात विसर्जन मिरणुकीत निर्बंध; गमेशोत्सवा काळात ड्रोनला बंदी
ठाणे, मुंब्र्यात विसर्जनाच्या दिवशी डीजेला बंदी? हिंदू सणांवर निर्बंध न घालण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळावा; जितेंद्र आव्हाडांचा खोचक टोला
प्रभादेवीत विसर्जन मिरवणुकीत स्वागत कक्ष उभारू नका, मुंबई पोलिसांकडू राजकीय पदाधिकाऱ्यांना नोटीस
AIADMK पक्षाने भारतीय जनता पक्ष आणि ‘एनडीए’ची साथ सोडली, AIADMK पक्षाच्या घोषणेननंतर चेन्नेईमध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा केला.
श्री क्षेत्र तुळजापूर (जि. धाराशीव) येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान तुळजापूर – सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
सरकारने स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असेल तर तुम्हाला मान्य करायला काय हरकत? सुप्रीम कोर्टाचा व्यापारी संघटनेला सवाल
सातव्या दिवशीही लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव बंद आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच कांदा व्यापारीही आक्रमक झाले असून त्यांनी थेट दिल्लीत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
चौंडीमध्ये मागील १८ दिवसापासून धनगर समाजाचे आमरण उपोषण आंदोलन सुरु आहे