मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आजपासून क्रिकेटच्या महासंग्रामास सुरुवात, कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे. तसेच मान्सून परतीच्या मार्गावर…, राज्यातील काही भागात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
आजपासून क्रिकेटच्या महासंग्रामास सुरुवात, भारतात होणाऱ्या विश्वचषकाला अवघ्या काही तासांत सुरुवात होणार आहे. वनडे विश्वचषकाचा हा 13 वा हंगाम आहे. आज (5 ऑक्टोबर रोजी) न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यामध्ये सलामीची लढत होत आहे.
गतविजेत्या इंग्लंड आणि गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंड संघांमधल्या लढाईनं या महायुद्धाची ठिणगी पडणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सलामीचा सामना होणार आहे. दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. विश्वचषकाच्या या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे.
राज्यातील काही भागात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
काही तांत्रिक कारणांमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील गुरुवारचा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. पुण्याकडे येणाऱ्या मार्गिकेवर दुपारी 12 ते 2 असा दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार होता. आता तो रद्द करण्यात आलाय.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या भालाफेकमध्ये भारतीय संघाने आपली दादागिरी दाखवली. या प्रकारात भारताच्या गोल्डन बॉय आणि जगातील अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले तर भारताच्या किशोर कुमारने रौप्यपदक जिंकले.
मुख्यमंत्री महोदयांचे गुरुवार दि.५ ऑक्टोबर, २०२३ रोजीचे कार्यक्रम
सकाळी ११.०० वा.
इंडिया टुडे कॉनक्लेव्ह.
● स्थळ:- हॉटेल ग्रँड हयात, मुंबई
दुपारी १२.३० वा.
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने चर्चासत्र
● स्थळ:- सेंट्रम हॉल, पहिला मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कुलाबा, मुंबई