मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड आणि नेदरलॅड यांच्यात सामना होणार आहे. तर कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे. तसेच मान्सून परतीच्या मार्गावर असून, राज्यातील काही भागात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
राज्यातील सत्तासंघर्षावर या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दोन्ही गटासमोर सुनावणी करणार आहेत.
राष्ट्रवादी पक्ष कोणाचा, यावर आज सुनावणी होणार आहे. अजितदादा गट व शरद पवार गट दोन्हीकडून पक्षावर व चिन्हावर दावा करण्यात आला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज टोलवर सकाळी १०.३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत
मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आली, याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी पार पडणार आहे
उद्धव ठाकरे यांच्या पक्ष-चिन्ह लढाईवर 11 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती पार्डी वाला आणि मनोज मिश्रा यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.
मातोश्रीवर आज उद्धव ठाकरे लातूर व धारशीव येथील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.
मुख्यमंत्री यांचे आजचे कार्यक्रम
दुपारी १२.०० वा.
श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिलिंग विकासाच्या सुधारीत आराखड्यास मंजूरी देण्याबाबत शिखर समितीची बैठक
● स्थळ :- स्थळ:- समिती कक्ष, ६ वा मजला, मंत्रालय, मुंबई
दुपारी १२.३० वा.
श्री घृष्णेश्वर तीर्थक्षेत्र विकास आराखडा शिखर समितीची बैठक
● स्थळ :- स्थळ:- समिती कक्ष, ६ वा मजला, मंत्रालय, मुंबई
दुपारी ०३.०० वा.
राज्यातील आरोग्य व्यवस्थेमध्ये सुधारणात्मक उपाययोजना करणेबाबत बैठक
● स्थळ :- स्थळ:- समिती कक्ष, ६ वा मजला, मंत्रालय, मुंबई
सायंकाळी ०७.०० वा.
नॅशनल डे ऑफ द रिपब्लीक ऑफ युगांडा अॅण्ड लॉंच ऑफ युगांडा एअरलाइन्स (व्ही.सी. द्वारे)
● स्थळ :- वर्षा निवासस्थान
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने विजयी सलामी दिली आहे, काल कांगारुवर ६ विकेटनी भारताने मात करत दणदणीत विजय मिळवला.
आज विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत न्यूझीलंड आणि नेदरलॅड यांच्यात सामना होणार आहे.
कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे.
मान्सून परतीच्या मार्गावर असून, राज्यातील काही भागात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरुआहे. हमासने इस्रायलवर 5 हजार रॉकेटने पहिला हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडूनही लढाऊ विमानांनी सातत्याने हल्ले केले जात आहेत.