मुंबई – आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज मराठवाड्यातील अनेक प्रश्नांना आणि समस्या सोडविण्यासाठी कॅबिनेट बैठक होणार आहे. तर आज राज्यातील काही भागात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरे सध्या राज्यात दुष्काळी दौऱ्याची पाहणी करताहेत, आज नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करणाहेत. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
आजपासून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घेतला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केला आहे. याची आजपासून अंमलबजावणी होणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅबिनेट दाखल झाले आहे. मराठवाड्यातील अनेक प्रश्नांना आणि समस्या सोडविण्यासाठी ही बैठक उपयोगी ठरेल. या बैठकीसाठीचे नियोजन युद्धपातळीवर करण्यात आले आहे. आज अनेक संघटना निवेदन देणार आहेत. सत्ताधारी विरोधक एकत्र येणार आहेत.
आदित्य ठाकरे सध्या राज्यात दुष्काळी दौऱ्याची पाहणी करताहेत, आज नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करणाहेत. आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उद्या संवाद साधताना दिसणार आहेत.
आज राज्यातील काही भागात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि वाटताना स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. प्रसाद स्वतः तयार करून वितरीत करणाऱ्या मंडळांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे नोंदणी करावी, अशा सूचना अन्न व औषध प्रशासनाने शहरातील मंडळांना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री यांचे शनिवार दि.१६ सप्टेंबर, २०२३ रोजीचे कार्यक्रम
(औरंगाबाद दौरा)
सकाळी ०९.०० वा.
औरंगाबाद शहरातील विविध प्रकल्प इमारतींचे ऑनलाईन भूमीपुजन/ लोकार्पण कार्यक्रम
१) सातारा व देवळाई परिसरातील मलनि:स्सारण योजनांचे ई भूमीपुजन.
२) हर्सूल येथील घनकचरा प्रक्रिया केंद्राचे ई लोकार्पण.
३) सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कॉफी टेबल बुक, गॅझेटियर, डॉक्युड्रामा फिल्म व पोस्टल कव्हर विमोचन
४) औरंगाबाद जिल्ह्याच्या भविष्यातील वाटचाल व प्रगतीबाबत मंथन बैठक.
● स्थळ :- वंदे मातरम सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, औरंगाबाद,
सकाळी १०.५० वा.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण.
● स्थळ :- स्मार्ट सिटी कार्यालय, औरंगाबाद.
सकाळी १०.५५ वा.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा / विभाग / तालुका नामकरण बोर्डाचे अनावरण.
● स्थळ :- स्मार्ट सिटी कार्यालय, औरंगाबाद,
सकाळी ११.०० वा.
राज्य मंत्रीमंडळ बैठक.
● स्थळ :- स्मार्ट सिटी कार्यालय, औरंगाबाद.
मंत्रीमंडळ बैठकीनंतर
लातूर येथील शासकीय निवासी शाळेच्या शासकीय वसतिगृह इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन.
● स्थळ :- स्मार्ट सिटी कार्यालय, औरंगाबाद,
दुपारी ०२.०० वा.
पत्रकार परिषद.
● स्थळ :- अण्णाभाऊ साठे रिसर्च सेंटर, स्मार्ट सिटी कार्यालय जवळ, औरंगाबाद.
सायंकाळी ०५.१५ वा.
गॅलॅक्सी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन.
● स्थळ :- चेतक घोडा जवळ, अग्नीहोत्र चौक, ज्योतीनगर, औरंगाबाद.
सायंकाळी ०५.४० वा.
गणेश महासंघ कार्यालयाचे उद्घाटन.
● स्थळ :- निराला बाजार, औरंगाबाद
रात्री ०८.३० वा.
‘गर्जा मराठवाडा’ कार्यक्रमास उपस्थिती. ● स्थळ :- क्रांती चौक, औरंगाबाद