मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आजपासून राज्यासह देशात गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. यासाठी सर्वत्र जय्यत तयारी केली आहे. कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे. तसेच राज्यातील काही भागात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
आजपासून राज्यासह देशात गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. यासाठी सर्वत्र जय्यत तयारी केली आहे.
सर्व गणेश मंडळांना पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. गणेश भक्तांनी गणेश उत्सवाचा आनंद घ्यावा आणि सतर्क रहावे. सुरक्षेसाठी मुंबईकरांना चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही, असे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी म्हटले आहे.
महिला आरक्षण विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी, सूत्रांची माहिती, आज नव्या संसदेत सादर होण्याची शक्यता
ऐन सणासुदीच्या तोंडावर लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यामध्ये कांद्याचे लिलाव पुन्हा बेमुदत बंद राहणार आहेत. कांदा व्यापाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुधवार 20 सप्टेंबरपासून कांदा लिलाव बेमुदत बंदचा निर्णय जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने घेतलाय.
कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे.
राज्यातील काही भागात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.