मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे. तसेच धनगर आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येत आहे. ठिकठिकाणी आंदोलन, रस्ता रोको करण्यात येत आहे. या दरम्यान आता धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत आज मुंबईत बैठक होणार आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
लोकसभेत काल महिला आरक्षण विधेयक 454 मतांनी मंजूर झालंय. ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने महिला आरक्षणाच्या विरोधात मतदान केले आहे. यानंतर आज राज्यसभेत विधेयकावर यावर चर्चा होणार आहे.
नाशिमधील कांद्या व्यापाऱ्यांनी केलेल्या संपावर, जिल्हाधिकाऱ्यासोबत बैठक होणार आहे
मनोज जरांगे-पाटील यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे
यंदाच्या प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन प्रमुख पाहुणे असण्याची शक्यता; बुधवारी पंतप्रधान मोदींनी त्यांना आमंत्रण दिले आहे
सार्वजनिक आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती सुरु आहे. गट क आणि ड या पदांसाठी ही भरती आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक 22 सप्टेंबर रात्री 11 वाजून 55 मिनिटांपर्यंत अर्ज करु शकतात. सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे.
धनगर आरक्षणासाठी आंदोलन करण्यात येत आहे. ठिकठिकाणी आंदोलन, रस्ता रोको करण्यात येत आहे. या दरम्यान आता धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत आज मुंबईत बैठक होणार आहे.
राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
बुधवारी दिड दिवस गणपतीचे रात्री ९ वाजेपर्यंत एकून ३८, ४१५ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यात ९६ सार्वजनिक मूर्ती होत्या. ३८, ३१९ घरगुती मूर्तींपैकी १७, १७५ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. तर, ४९ मूर्तींचे सार्वजनिक मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. तर गणपती विसर्जन करताना बुडून तिघांचा मृत्यू, पालघरच्या वाडा येथील दुर्दैवी घटना
मुख्यमंत्री महोदयांचे गुरुवार दि.२१ सप्टेंबर, २०२३ रोजीचे कार्यक्रम
दुपारी ०२.०० वा.
धनगर समाजाच्या शिष्टमंडळासमवेत बैठक.
● स्थळ :- सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
दुपारी ०३.०० वा.
राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी कर्ज उभारणीबाबत बैठक
● स्थळ :- सह्याद्री अतिथीगृह, मुंबई