मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज ‘एक देश, एक निवडणुकी’साठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची बैठक पार पडणार आहे. आज पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. तसेच राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
आज ‘एक देश, एक निवडणुकी’साठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची बैठक पार पडणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर, अमित शहा दुपारी 3 वाजता लालबागच्या दर्शन घेणार, यानंतर अमित शहा वर्षावर जाणार, तसंच फडणवीसांच्या घरीही गणपती दर्शनाला जाणार
आज पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर 25 सप्टेंबरला घेणार सुनावणी, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ठरली तारीख
राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुढील 48 तासात राज्यात मॉन्सून सक्रिय राहणार असल्याचे सांगितले जातंय. रायगड, भंडारा, गोंदिया, नागपूरमध्ये तुरळक ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
क्रिकेट – काल भारताने कांगारुवर ५ विकेटनी मात केली आहे, तर उद्या दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे
आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी वर्ल्ड कप ट्रॉफीचा दौरा सुरु आहे. ही वर्ल्ड कप ट्रॉफी 26 सप्टेंबरला पुण्यात येणार आहे. या निमित्ताने वर्ल्ड कप रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मेगा ब्लॉक नसणार
गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या CSMT-कल्याण विभागाच्या मुख्य मार्गावर आणि CSMT-पनवेल हार्बर मार्गावर ट्रान्स-हार्बर लाईन आणि BSU लाईनच्या उपनगरीय विभागांसह कोणताही मेगा ब्लॉक नसणार.