मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे. तसेच राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना आज होणार आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
आमदार अपात्रतेच्या संदर्भात 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर दरम्यान युक्तिवाद होणार आहे. 23 नोव्हेंबर नंतर दोन आठवड्यात अंतिम सुनावणी होणार आहे. सर्व याचिका एकत्रित करण्यावर 13 ऑक्टोबरला सुनावणी पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बाप्पाच्या विसर्जनानिमित्त उद्या मध्यरात्री लोकलच्या १८ विशेष फेऱ्या, गुरुवारी मध्यरात्रीनंतर शुक्रवारी पहाटेपर्यंत मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल फेऱ्या उपलब्ध राहणार आहेत.
मंत्रालयातील प्रवेशासंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मंत्रालयात वारंवार होणारे आत्महत्याचे प्रयत्न व सुरक्षा जाळीवर केल्या जाणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. मंत्रालयात येणाऱ्या सर्व व्यक्तींना यापुढे प्रवेश पास बंधनकारक असणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत 29 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान अहमदाबादमध्ये संघाच्या संघटनात्मक बैठकींसह विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. मंगळवारपासून गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
बेस्ट उपक्रमाने आपल्या ताफ्यातील एसी बसची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उपक्रम आणखी २५० सिंगल डेकर एसी बस ताफ्यात दाखल करणार आहे. त्यासाठी बुधवारी निविदा जारी केली जाणार आहे.
सह्याद्रीवर पार पडलेल्या बैठकीत कांद्याप्रश्नी तोडगा नाहीच! केंद्रीय सचिवांची दांडी, पुढील बैठक 29 सप्टेंबरला दिल्लीत होणार
मनोज जरांगेंच्या मागणीनंतर कुणबी नोंदींच्या तपासणीला वेग आला आहे. मराठवाड्यात दीड महिन्यात 65 लाख अभिलेखांची तपासणी करण्यात आली आहे. 65 लाख अभिलेखांमध्ये केवळ 5 हजार कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या आहेत.
पुणे शहरात गणेशोत्सव काळात ड्रोन उडवण्याला बंदी घालण्यात आली आहे. ड्रोनद्वारे व्हिडीओ काढल्यास एअरक्राफ्ट अॅक्टनुसार कारवाई केली जाणार आहे. पुण्यात ड्रोन बंदीचे पुणे पोलिसांनी आदेश दिले आहेत.
कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे.
धनगर समाजाच्या आरक्षणाविषयी चौंडी येथील उपोषण 21 व्या दिवशी मागे घेण्यात आले. सरकारचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले मंत्री गिरीश महाजन यांनी यशस्वी तोडगा काढला. सरकार आरक्षणाविषयी सकारात्मक असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.
राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना आज होणार आहे.