मुंबई- आज दिवसभरात अनेक महत्वाचे कार्यक्रम तसेच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे. तसेच राज्यातील काही भागात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. जाणून घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी…
दिवसभरातील महत्त्वाचे काय…
मा. मुख्यमंत्री महोदयांचे बुधवार दि.४ ऑक्टोबर, २०२३ रोजीचे कार्यक्रम
दुपारी ०२.३० वा.
केंद्रीय गृह मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०६.१०.२०१३ रोजी आयोजित Left Wing Extremism (LWE) बैठकीबाबत पूर्वचर्चा.
● स्थळ:- वर्षा निवासस्थान, मुंबई
दुपारी ०३.३० वा.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ आढावा बैठक
● स्थळ:- वर्षा निवासस्थान, मुंबई
सायंकाळी ०४.३० वा.
महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण संचालक मंडळाची बैठक
● स्थळ:- वर्षा निवासस्थान, मुंबई
विधान परिषद कार्यालय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेणार आहे. पक्ष कुणाचा याबाबतची कागदपत्र विधान परिषद कार्यालय केंद्रीय निवडणूक आयोग मागणार आहे. निलम गोऱ्हे, बजोरिया आणि मनिषा कायंदे यांना अपात्र करण्याची ठाकरे गटाची मागणी आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्या असून, मंत्रिमंडळ विस्तारावर वरिष्ठाशी चर्चा होणार आहे.
कोर्टात (Court) मुंबई तसेच दिल्लीत (delhi) सुनावणी पार पडणार आहे.
राज्यातील काही भागात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
नांदेड शासकीय रुग्णालयात आणखी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नांदेडमधील मृतांचा आकडा हा 35 वर पोहचला आहे.
मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर दर बुधवारी नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत.
शिवाजी पार्क येथील मैदानावर दसरा मेळाव्यासाठी अद्यापही त्यांना परवानगी न मिळाल्याने ठाकरे गटाकडून खासदार अनिल देसाई यांनी पालिका विभाग कार्यालयाला एक स्मरणपत्र दिले आहे. तसेच, तातडीने दसरा मेळाव्याला परवानगी देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.