Photo credit- Team navrashtra
वाई/प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीचा धुरळा राज्यभरात सर्वत्रच पाहायला मिळतोय. अनेक उमेदवारांच्या गाड्यांचा ताफा, जेवणावळी सर्वत्रच पाहायला मिळत आहे. मात्र रखरखत्या उन्हात कमीत कमी यंत्रणेवर वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी प्रचाराची जोरदार भिंगरी सुरू केली आहे. पुरुषोत्तम जाधव अपक्ष उमेदवार असल्याने त्यांना सर्वच पक्षातून पाठिंबा देखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांनी प्रत्यक्ष मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिल्याने सकाळी 8 वाजल्यापासून त्यांच्या प्रचाराला सुरुवात होते.
निवडणूक आली की सत्तेत असलेले नेते पैशाचा प्रचंड वापर करून निवडणुका लढवितांना आपण पाहतो, मात्र सामान्य कुटुंबातील व्यक्ती असलेल्या पुरुषोत्तम जाधव यांनी अत्यंत साध्या पद्धतीने प्रचार यंत्रणा सुरू केली आहे. आज वाई पूर्व भागात प्रचार दिवसभर सुरू होता. सुरूर ,कवठे, अनवडी, शिरगाव किकली या परिसरात प्रचार सुरू असतानाच पुरुषोत्तम जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घरातूनच आणलेल्या भाकरी कांदा, चटणी व मिरचीच्या झणझणीत खर्ड्यावर ताव मारून पुढच्या प्रचाराला आगेकूच केली.
हेही वाचा: Justice Chandiwal Report: 100 कोटी प्रकरणात अनिल देशमुखांना क्लीनचीट
सामान्य शेतकरी व वारकरी घराचा समृद्ध वारसा असलेल्या पुरुषोत्तम जाधव यांचा निवडणुकीतील साधेपणा व सर्वसामान्य घटकातील दिलासा देण्याची पद्धत गाव गावच्या मित्रांना हृदयाला स्पर्श करत असून सामान्य कुटुंबातील संघर्ष करणाऱ्या पुरुषोत्तम जाधव यांना एक वेळ संधी नक्की देणार असे प्रतिक्रिया प्रत्येक गावचे मतदार देत आहेत.
महाबळेश्वर हे देशातील महत्त्वाचे पर्यटन क्षेत्र असून महाबळेश्वर व परिसराच्या पर्यटन विकासासाठी अत्यंत नियोजनबद्ध आराखडा करून वाहतूक कोंडी सारखी समस्या कमी करण्याची गरज आहे तसेच व्यापाऱ्यांचे देखील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत महाबळेश्वरच्या पर्यटन विकासासाठी अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या पाठीशी महाबळेश्वर वाशी यांनी उभे रहावे असे आवाहन सायली कोंढाळकर यांनी व्यक्त केले.महाबळेश्वर शहरातील गणेश कॉलनी येथे झालेल्या कोपरा सभेत त्या बोलत होत्या. यावेळी वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभेचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव, निशा जाधव यांच्यासह महाबळेश्वर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा: लेबनॉनच्या हिजबुल्लाह नियंत्रित भागांवर इस्त्रायलचा भीषण हल्ला; 20 हून अधिक लोक ठार
यावेळी सायली कोंढाळकर म्हणाल्या, महाबळेश्वर शहराला निसर्गाने भरभरून वरदान दिली आहे मात्र पर्यटनाच्या दृष्टीने आजही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पर्यटन वाढीसाठी दूरदृष्टी असलेले नेतृत्व आपण सर्वांनी विधानसभेत सन्मानाने पाठवायला हवे यासाठी महाबळेश्वर शहर व परिसरातील महिला नागरिक व व्यापाऱ्यांनी पुरुषोत्तम जाधव यांच्यासारख्या कर्तृत्ववान व अभ्यासू व्यक्तीला आमदार म्हणून विधानसभेत मोठ्या मताधिक्याने पाठवावे.
वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचारासाठी महाबळेश्वर शहरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असून सध्या महाबळेश्वर शहरात घरोघरी प्रचार सुरू केला आहे.
हेही वाचा: पीएनजी ज्वेलर्सच्या वार्षिक महसुलात 46 टक्क्यांची वाढ; सोन्याच्या मागणीतही वाढ!