Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maval ZP Election 2026: मावळचा थरार: भाजपचा ३० वर्षांचा गड अभेद्य राहणार की राष्ट्रवादी मुसंडी मारणार?

त्यावेळी सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे नशिबाने भाजपच्या वाट्याला आली. सभापतीपदी एकनाथ टिळे तर उपसभापतीपदी रूपलेखा होरे यांची निवड झाली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 07, 2026 | 12:28 PM
Maval ZP Election 2026: मावळचा थरार: भाजपचा ३० वर्षांचा गड अभेद्य राहणार की राष्ट्रवादी मुसंडी मारणार?
Follow Us
Follow Us:
  • मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात
  • तीस वर्षांपासून मावळ पंचायत समितीवर भाजपची सत्ता कायम
  • राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कंबर कसली
 

Maval ZP Election 2026: मावळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून आज मतदान होत आहे. तर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र दिसत आहे. मावळमध्ये जिल्हा परिषदेचे ५ गट आणि पंचायत समितीचे १० गण आहेत. त्यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनली असून वातावरण तापले आहे.

गेल्या सुमारे तीस वर्षांपासून मावळ पंचायत समितीवर भाजपची सत्ता कायम आहे. सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपने जोरदार प्रचार यंत्रणा उभी केली असून, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. सन १९९० पासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मावळ पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकत राहिला. एका टप्प्यावर काँग्रेस व भाजपमध्ये चिठ्या टाकून कौल घेण्यात आला होता.

Mumbai Mayor : अखेर भाजपकडून महापौरपदाची घोषणा, तर उपमहापौर शिवसेनेचे संजय घाडी

तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची घोडदौड

त्यावेळी सभापती व उपसभापती ही दोन्ही पदे नशिबाने भाजपच्या वाट्याला आली. सभापतीपदी एकनाथ टिळे तर उपसभापतीपदी रूपलेखा होरे यांची निवड झाली होती.

१९९५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून रूपलेखा ढोरे विजयी होऊन आमदार झाल्या. त्यानंतर १९९५ ते २०१८ या कालावधीत विधानसभा व पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपने वर्चस्व कायम ठेवले आणि सलग तीस वर्षे सत्ता अबाधित राखली.

मात्र २०१९ मध्ये मावळच्या राजकारणात मोठा बदल झाला. पूर्वी भाजपमध्ये असलेले सुनील शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यांच्या विजयासोबतच तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव वाढू लागला.

Gujrat Crime: मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी पाठवलेल्या १५ वर्षीय मुलीवर मामासह चुलत भावाकडून

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सुनील शेळके यांनी एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा आमदारकी मिळवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा, तळेगाव आणि वडगाव नगरपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे.

कोणाचे पारडा जड ?

सध्याच्या घडीला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव वाढल्याचे चित्र असले, तरी ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप आपला पारंपरिक बालेकिल्ला राखणार की राष्ट्रवादी काँग्रेस विजय खेचून आणणार, याकडे संपूर्ण मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे. ७ फेब्रुवारीच्या मतदानानंतर ९ फेब्रुवारीला होणारी मतमोजणीच या राजकीय सत्तासंग्रामाचा अंतिम निकाल ठरवणार आहे.

 

 

Web Title: Will the bjps 30 year stronghold in maval remain impregnable or will the ncp make a breakthrough

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Maval Politics
  • NCP Politics

संबंधित बातम्या

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी
1

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी

मोठी बातमी ! संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता; राघव चड्ढांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी?
2

मोठी बातमी ! संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता; राघव चड्ढांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.