Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“५० खोके घेऊन…” आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात

बंडखोरीच्या महिनाभर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदेला भेटायला बोलावलं होतं. आणि त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे का हे विचारलं होतं. नोव्हेंबरमध्ये माझ्या वडिलांची शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून विविध माध्यमातून ही माहिती समोर येत होती की ते पक्षात बंडखोरी करण्याच्या वाटेवर आहेत

  • By Aparna
Updated On: Oct 05, 2023 | 06:44 PM
“५० खोके घेऊन…” आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात
Follow Us
Close
Follow Us:

सहा वर्षांपूर्वी आम्ही मुंबईत पेग्विंन घेऊन आलो. कोणत्याही प्राण्याची जगभरातून आयात करायची असते तेव्हा मोठा पत्रव्यवहार वगैरे करावा लागतो. त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच त्यांना भारतात आणलं होतं. आज पेंग्विनमुळे प्राणीसंग्रहालय नफ्यात आलं आहे. दरदिवशी ३० हजार लोक प्राणीसंग्रहालयाला भेट देतात आणि पेंग्विन कसे आहेत हे पाहतात. आता पेंग्विनची स्थिती पाहा आणि चित्त्याची पाहा. आमच्या पेंग्विनने मुंबई पालिकेला ५० खोक्यांचं उत्पन्न मिळवून दिलं. पण जे पळून गेले ते स्वतःसाठी ५० खोके घेऊन पळाले.” असा घणाघात आदित्य ठाकरे यांनी केला

उद्धव ठाकरे गटाचे युवानेता आदित्य ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयात पेंग्विन आणले होते. मुंबईच्या उष्ण वातावरणात पेंग्विन टीकू शकणार नाहीत, अशी टीका त्यावेळी करण्यात आली होती. तसंच, मुंबईसारख्या शहरांत अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प रखडले आहेत, अनेक पायाभूत सुविधांपासून मुंबईकर वंचित असताना पेंग्विनवर खर्च करण्याची गरज काय? असा सवाल विरोधकांकडून विचारला गेला होता. त्यावरून आदित्य ठाकरेंवर सातत्याने टीका केली जाते. यावर त्यांनी आज चोख प्रत्युत्तर दिलं आहे. आदित्य ठाकरेंना बेबी पेंग्विन संबोधून त्यांची खिल्ली उडवली जाते. याबाबत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला

एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत माहित होतं का?
“बंडखोरीच्या महिनाभर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदेला भेटायला बोलावलं होतं. आणि त्यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे का हे विचारलं होतं. नोव्हेंबरमध्ये माझ्या वडिलांची शस्त्रक्रिया झाली. तेव्हापासून विविध माध्यमातून ही माहिती समोर येत होती की ते पक्षात बंडखोरी करण्याच्या वाटेवर आहेत. तसंच, उद्धव ठाकरे आता रुग्णालयात आहेत, ते पक्ष चालवू शकतात का? असा प्रचारही त्यांनी केला. एखाद्या माणसांचं मन किती काळं असू शकतो. ज्या माणसाने आपल्याला घडवलं, जेव्हा तो रुग्णालयात असतो त्याचा फायदा घेऊन हे स्वतःचं करिअर बनवतात. ज्यावेळी त्यांना विचारलं तेव्हा ते रडू लागले आणि म्हणाले ते तुरुंगात टाकतील. तुरुंगात जाण्याचं हे वय नाही, मुलालाही तुरुंगात टाकतील. असं बोलून ते पळून गेले (बंडखोरी केली). ते पळाले कारण ते घाबरले. जे धीट होते, प्रामाणिक होते ते पक्षासोबत राहिले.”

 

Web Title: With 50 boxes aditya thackerays attack on the shinde group nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2023 | 06:24 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • Eknath Shinde
  • maharashtra
  • Udhhav Thackeray

संबंधित बातम्या

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
1

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
2

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
3

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
4

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.