ठाणे : पलावा (Palava) येथील २५ हजार प्लॅट धारकांना (25 Thousand Flat Holders) मालमत्ता कर (Property Tax) न भरल्याने केडीएमसी (KDMC) प्रशासनाने जप्तीच्या नोटीसा पाठविल्या आहेत (Foreclosure notices have been sent). ही नोटीस त्वरीत रद्द करुन आयटीपी योजने अंतर्गत नागरीकांना दिलासा मिळावा यासाठी मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी आज केडीएमसी आयुक्तांची भेट घेतली (Met KDMC Commissioner). लवकर हा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन आयुक्तांनी मनसे आमदार पाटील यांना दिले आहे. कोपर रेल्वे ट्रॅक आणि माणकोली पुलाखाली रेती उपसा होत असल्याने पूल आणि रेल्वे ट्रॅकला धोका वाढतो. एखादी घटना झाल्यावर प्रशासन जागे होणार का असा प्रश्न उपस्थित करत रेती उपसा संदर्भात काय उपाययोजना केली पाहिजे असे मनसे आमदारांनी सांगितले.
आज सायंकाळी मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेतली. विविध विषयावर आयुक्तांसोबत चर्चा केली. यामध्ये पलावा येथील कासा रिओ आणि कासा बेला या परिसरातील २५ हजार फ्लॅट धारकांना केडीएमसीने मालमत्ता कर न भरल्याने नोटीस पाठविली आहे. ही नोटीस त्वरीत रद्द करण्यात यावी. या फ्लॅट धारकांना आयटीपी प्रकल्पांतर्गत सवलत मिळावी यासाठी अनेक वर्षापासून मागणी आहे. ही मागणी केडीएमसीने मान्य करावी. नागरीकांना दिलासा द्यावा. या संदर्भात आयुक्तांनी सरात्मक प्रतिसाद दिला आहे.
[read_also content=”मनी लाँड्रिंग खटला प्रकरण : ईडी कारवाई विरोधात हसन मुश्रीफ उच्च न्यायालयात उद्या तातडीने सुनावणी निश्चित https://www.navarashtra.com/maharashtra/money-laundering-case-urgent-hearing-scheduled-tomorrow-in-hasan-mushrif-high-court-against-ed-action-nrvb-375869.html”]
डोंबिवली पूर्व स्टेशन परिसरीतील रस्ते फेरीवाला मुक्त करण्यात यावे. स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅण्डमुळे वाहतूक कोंडी होते. हा परिसर फेरीवाला आणि वाहतूक कोंडी मुक्त करावी यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र आयुक्तांनी यावर तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिल्याने पंधरा दिवसाकरीता हे आंदोलन स्थगित केले आहे. मात्र पंधरा दिवसांनी काही एक उपाययोजना झाली नाही तर मनसे आंदोलनावर ठाम असेल असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.
[read_also content=”छातीवर काढला होता गर्लफ्रेंडचा टॅटू, तिथंच मारला चाकू, अडल्ट स्टारने घेतला प्रियकराचा जीव केला घात आणि… https://www.navarashtra.com/crime/inside-story-shocking-news-onlyfans-star-courtney-clenney-fatally-stabbed-boyfriend-christian-obumseli-on-his-chest-explained-full-case-nrvb-375850.html”]
कोपर रेल्वे ट्रॅक परिसरात मोठय़ा प्रमाणात रेती उपसा केला जातो. त्यामुळे रेल्वे ट्रॅकला धोका निर्माण झाला आहे. तसेच मोठा गाव माणकोली खाडी पूल परिसरात रेती उपसा सुरु आहे. पूलाला धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. रेती उपसासाठी उपाययोजना केली पाहिजे. ज्यामुळे पुलाला आणि ट्रॅकला धोका होणार नाही. यासंदर्भात प्रशासनाने लवकरात लवकर एक निर्णय घ्यावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील हे करणार आहेत.