Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नारीशक्ती विधेयकासाठी साताऱ्यात महिला आघाडीचा आक्रमक मोर्चा; विरोधकांच्या भूमिकेवर जोरदार टीका

मोर्चाची सुरुवात शहरातील शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर घोषणाबाजी करत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 26, 2026 | 09:52 AM
नारीशक्ती विधेयकासाठी साताऱ्यात महिला आघाडीचा आक्रमक मोर्चा; विरोधकांच्या भूमिकेवर जोरदार टीका

नारीशक्ती विधेयकासाठी साताऱ्यात महिला आघाडीचा आक्रमक मोर्चा; विरोधकांच्या भूमिकेवर जोरदार टीका

Follow Us
Follow Us:

सातारा : लोकसभेत नारीशक्ती वंदन विधेयकाला विरोध झाल्याच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने शनिवारी जनआक्रोश मोर्चा काढत विरोधकांच्या भूमिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी हे विधेयक अत्यावश्यक असल्याचा ठाम आग्रह यावेळी धरण्यात आला.

मोर्चाची सुरुवात शहरातील शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर घोषणाबाजी करत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. “नारीशक्ती वंदन विधेयक मंजूर झालेच पाहिजे”, “महिलांचा सन्मान राखा” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

या आंदोलनात नगरसेविका आशा पंडित, सिद्धी पवार, हेमलता भोसले, मोनिका घोरपडे, रीना भणगे यांच्यासह नगराध्यक्ष अमोल मोहिते, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, उपनगराध्यक्ष अ‍ॅड. दत्ता बनकर, सरचिटणीस विकास गोसावी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेल्या निवेदनात, नारीशक्ती वंदन विधेयक महिलांच्या सन्मानासोबतच त्यांच्या राजकीय सहभागात वाढ घडवणारे महत्त्वाचे पाऊल ठरले असते, असे नमूद करण्यात आले. मात्र, विरोधकांनी याला अडथळा आणल्याने महिलांच्या प्रगतीस धक्का बसल्याचा आरोप करण्यात आला.

महिलांना निर्णय प्रक्रियेत अधिक संधी मिळावी, त्यांच्या नेतृत्वगुणांना वाव मिळावा आणि समाजातील सर्व क्षेत्रांत त्यांचा सन्मान वृद्धिंगत व्हावा यासाठी हे विधेयक तातडीने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली. तसेच महिलांविरोधी विचारसरणीला विरोध करण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. या मोर्चाला महिला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान, मोर्चामुळे काही काळ शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

जावलीतील पाणी टंचाईवर मंत्र्यांची तातडीची ‘अ‍ॅक्शन’; शिवेंद्रराजेंच्या बैठकीत कठोर निर्देश

Web Title: Women wing stages aggressive protest march in satara for the narishakti bill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

शामगावला दूध भेसळीवरील अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, भेसळयुक्त दूध तयार करणारे दाम्पत्य अटकेत
1

शामगावला दूध भेसळीवरील अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, भेसळयुक्त दूध तयार करणारे दाम्पत्य अटकेत

Wai News: बावधन येथे फटाकेमुक्त बेंदूर! पारंपरिक वाड्याचे हजारो बैलांची शाही मिरवणूक
2

Wai News: बावधन येथे फटाकेमुक्त बेंदूर! पारंपरिक वाड्याचे हजारो बैलांची शाही मिरवणूक

Satara News: अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुलीच्या विकासासाठी २६७ कोटींचा निधी मंजूर; छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश
3

Satara News: अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुलीच्या विकासासाठी २६७ कोटींचा निधी मंजूर; छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आदेश

‘व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल’; डॉ. नीलम गोऱ्हेंचे ‘महाराजस्व अभियान’वर मोठे विधान
4

‘व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल’; डॉ. नीलम गोऱ्हेंचे ‘महाराजस्व अभियान’वर मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.