Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 11 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महागाई करणारे सरकार हाय हाय’; काँग्रेसचा मोदी सरकारविरोधात हल्लाबोल, माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे मेलोडी चॉकलेट वाटप

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे वाढणारी महागाई आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात युवक काँग्रेसने उंब्रज येथे जोरदार आंदोलन केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 22, 2026 | 12:51 PM
‘महागाई करणारे सरकार हाय हाय’; काँग्रेसचा मोदी सरकारविरोधात हल्लाबोल, माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे मेलोडी चॉकलेट वाटप

‘महागाई करणारे सरकार हाय हाय’; काँग्रेसचा मोदी सरकारविरोधात हल्लाबोल, माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे मेलोडी चॉकलेट वाटप

Follow Us
Follow Us:
  • पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात उंब्रजमध्ये युवक काँग्रेसचा हल्लाबोल
  • सत्वशिला चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
  • उंब्रज पेट्रोल पंपावर काँग्रेसचे जोरदार आंदोलन
 

उंब्रज: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेवर पडणारा आर्थिक भार, वाढती महागाई आणि केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवार (२२ मे 2026) सकाळी १० वाजता उंब्रज येथील पेट्रोल पंपावर जोरदार आंदोलन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. “या सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय!”, “महागाई करणारे सरकार हाय हाय!” अशा घोषणांनी वातावरण चांगलेच तापले. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मेलोडी चॉकलेटचे वाटप करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्याचा आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा प्रतीकात्मक निषेध व्यक्त केला.

MSRTC Electric Bus : एसटीच्या ई-बस पुरवठ्यात मोठा घोळ? 1,288 बसांचे लक्ष्य अपूर्ण; कंत्राट रद्द करण्याची मागणी 

यावेळी बोलताना सत्वशिला चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणांवर आणि आर्थिक धोरणांवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परदेश दौरा हा देशहितासाठी नसून उद्योगपती अदानी यांना वाचविण्यासाठी असल्याचे दिसून येते. अदानी यांना नॉर्वेमध्ये काळ्या यादीत टाकण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना मदत करण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे. तिथे जाऊन चॉकलेट वाटण्यात आणि प्रसिद्धी मिळविण्यात सरकार व्यस्त आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “या सरकारची धोरणे सर्वसामान्य जनतेसाठी नसून केवळ काही उद्योगपतींच्या हितासाठी आहेत. परदेशात फिरून देशाची प्रतिष्ठा वाढत नाही. लोकाभिमुख निर्णय, सक्षम अर्थव्यवस्था आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रभावी उपाय योजना केल्या तरच जगाचे लक्ष भारताकडे वेधले जाते. केवळ स्वतःला ‘विश्वगुरू’ म्हणवून घेतल्याने कोणी विश्वगुरू होत नाही.”

या आंदोलनात अजित पाटील चिखलीकर, वसंत पाटील, नामदेव पाटील, सुरेश पाटील, संग्राम पवार, अमित जाधव, सत्यवान चव्हाण, प्रताप देशमुख आणि शंकर खोत यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि महागाईवर तातडीने नियंत्रण आणावे, अन्यथा जनआंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला. आंदोलनामुळे काही काळ परिसरातील वातावरण चांगलेच तापले असून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधातील काँग्रेसचा आक्रमक सूर पुन्हा एकदा रस्त्यावर उमटल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Thane Station News: ठाणे रेल्वे स्थानक होणार ‘हायटेक’; प्रवाशांसाठी वाढणार अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाच्या सुविधा!

Web Title: Youth congress protest against petrol diesel price hike at umbraj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 12:51 PM

Topics:  

  • Congress
  • maharashtra
  • Petrol diesel price

संबंधित बातम्या

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेचा पुढाकार! CET संकेतस्थळावरील सूचना मराठी भाषेत करण्याची मागणी
1

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिवसेनेचा पुढाकार! CET संकेतस्थळावरील सूचना मराठी भाषेत करण्याची मागणी

Thane Building Collapse : ठाण्यात पावसाचा कहर! मद्रास चाळीची गॅलरी कोसळली; १० वर्षीय मुलाचा मृत्यू, महिला व बालक जखमी
2

Thane Building Collapse : ठाण्यात पावसाचा कहर! मद्रास चाळीची गॅलरी कोसळली; १० वर्षीय मुलाचा मृत्यू, महिला व बालक जखमी

Satara News : वाईच्या पश्चिम भागातील उत्खनन प्रकरण तापले; दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
3

Satara News : वाईच्या पश्चिम भागातील उत्खनन प्रकरण तापले; दोषींवर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Winter Session 2026: हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; मंत्री नसल्याने विधान परिषदेचे ‘सूप’ वाजले, विरोधकांचा सरकारवर निशाणा
4

Winter Session 2026: हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; मंत्री नसल्याने विधान परिषदेचे ‘सूप’ वाजले, विरोधकांचा सरकारवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.