मुंबई- आज गुरुवारी राजकीय क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक व दुःखद घटना समोर येत आहे. युवासेनेच्या सचिव ऍड सौ दुर्गाताई भोसले शिंदे यांचे आज हृदयविकारामुळे दुःखद निधन झाले, (Durgatai Bhosale-Shinde Passed Away) त्यांचे वय 30 वर्षे होते. शिवसेना युवासेना (Yuvasena) परिवाराच्या एक हरहुन्नरी कर्तुत्वान महिला रणरागिनी आपल्यातुन कायमच्या निघून गेलेल्या आहेत. काल ठाण्यात निघालेल्या जन आक्रोश मोर्चा दरम्यान उस्फुर्तपणे घोषणा देत होत्या. कालच्या मोर्च्यात त्या सहभागी झाल्या होत्या. तसेच जो सोमवारी रात्री ठाण्यात राडा झाला होता, त्या राड्यात सुद्धा त्या होत्या. (Durgatai Bhosale-Shinde Passed Away)
शिवसेना महिला आक्रमक चेहरा…
दरम्यान, शिवसेनेच्या रणरागिनी दुर्गाताई भोसले शिंदे ह्या महिला आक्रमक चेहरा अशी त्यांची ओळख होती. काल मोर्च्यात सहकारी शिवसैनिकांसोबत चालत होत्या तेंव्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागले काही त्रास जाणवू लागला होता. त्या नतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने विश्रांती आणि उपचारासाठी मुंबईला पाठवले. परंतु बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे, पती, आई आणि वडील केशवराव भोसले, भाऊ असा परिवार आहे. अगदी कमी वयात त्या गेल्यामुळं राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे. सर्व शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी दुर्गाताई भोसले शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.