Adipurush – आदिपुरूष हा सिनेमा सध्या देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. सर्वच स्तरातून या सिनेमाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्यात ‘आदिपुरुष’ने रिलीजच्या पाचव्या दिवशी फक्त 10.80 कोटी कमावले. त्यानंतर सिनेमाची एकूण कमाई आता 247.90 कोटींच्या जवळपास गेली आहे. तब्बल 500 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेला ‘आदिपुरुष’ हा बिग बजेट सिनेमा आहे. रिलीजपूर्वीच या सिनेमाने जवळपास 400 कोटींची कमाई केली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट भरघोस कमाई करेल अशी आशा होती. मात्र, हा चित्रपट आता लवकरच बॉक्स ऑफिसवरुन काढता पाय घेईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत असतानाच आहे. 22 आणि 23 जूनला या चित्रपटाचं तिकीट फक्त 150 रूपये ठेवण्यात आलं आहे. याबाबतची पोस्ट अभिनेत्री क्रिती सॅनॉनने (Kriti Sanon) आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. (adipurush) (box office)
[read_also content=”सहाव्या दिवशी गडगडले ‘आदिपुरुष’च्या कमाईचे आकडे, प्रेक्षकांना परत थिएटरकडे वळवण्यासाठी निर्मात्यांचा ‘हा’ नवा फंडा https://www.navarashtra.com/entertainment/adipurush-box-office-collection-reduced-on-sixth-day-nrsr-420929/”]
ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशननेदेखील ‘आदिपुरुष’ सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित या सिनेमावर बंदी घालण्यात यावी यासाठी मागणी केली होती.